गुप्त धनासाठी मांडूळ तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 08:02 PM2018-09-15T20:02:00+5:302018-09-15T20:10:35+5:30

पाचोरा तालुक्यात दोन जणांना अटक

Scandal smuggling for hidden treasures | गुप्त धनासाठी मांडूळ तस्करी

गुप्त धनासाठी मांडूळ तस्करी

Next
ठळक मुद्देपाठलाग करून पकडले आरोपींना दोन्ही संशयित आरोपी वनविभागाकडे सोपविले

पाचोरा, जि.जळगाव : गुप्तधन शोधण्यासाठी मांडूळ जातीच्या सापाची शिकार करून विक्री करताना दोन जणांना पाचोरा पोलिसांनी रंगेहात पकडले.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, दोन इसम मोटारसायकलवर दुर्र्मीळ अशा मांडूळ जातीच्या सापाची शिकार करून विक्री करीत असल्याची गुप्त खबर पाचोरा पोलीस कॉ.अमृत पाटील यांना मिळाली.
खडकदेवळा गावाकडे मोटारसायकलवर इसम मांडूळ घेऊन गेल्याचे समजले. यावरून पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय नलावडे, पो.कॉ.अमृत पाटील, पो.कॉ.किरण पाटील, पो.कॉ.प्रशांत चौधरी यांनी तत्काळ सापळा रचला.
चिंचखेडे गावाजवळ मोटारसायकल (एमएच १९ बीएस ९५४) वरील अजय साहेबराव पाटील (वय ३०, रा.खडकडेवळा बुद्रूक, ता.पाचोरा यास पकडले. त्याच्याजवळील बॅगमध्ये दुतोंडी काळसर रंगाचा दुर्मीळ मांडूळ जातीचा साप व भुरकट तांबडी माती असे साहित्य आढळून आले. त्यास अटक करण्यात आली, तर त्याच्यासोबतचा पळून जात असलेला इसम मनोज ज्ञानेश्वर गावंडे रा कुºहा काकोडा, ता.मुक्ताईनगर यास सारोळा रोडवर पळून जाताना अटक करण्यात आली. दोघा आरोपींविरुद्ध पाचोरा पोलिसात गु.र.नं.१४/१८, वन्यजीव अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, ४४, ४८ अ ४९ अ, ५१ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा व संशयित आरोपींना वनाधिकारी ज्ञानेश्वर देसाई यांच्याकडे तपासासाठी ताब्यात देण्यात आले आहे.

 

Web Title: Scandal smuggling for hidden treasures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.