संशोधन कार्यासाठी मिळणार शिष्यवृत्ती
By admin | Published: June 22, 2017 12:08 PM2017-06-22T12:08:35+5:302017-06-22T12:08:35+5:30
माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी दिला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला 1 लाख रुपयांचा धनादेश
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.22 : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर संशोधन करणा:या विद्याथ्र्याना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री व छत्रपती शिवाजी महाराज मेमोरिअल राष्ट्रीय समती, नवी दिल्लीचे सचिव विजय नवल पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून पाटील यांनी बुधवारी कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्याकडे एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
दरवर्षी दीड लाख रुपये या शिष्यवृत्तीसाठी आणि 50 हजार रुपये छत्रपती शिवाजी महाराज अध्ययन व संशोधन केंद्रासाठी असे मिळून दोन लाख रुपये विजय नवल पाटील यांनी जाहीर केले. अॅड.बी.के.शिंदे, प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी, माजी व्यवस्थापक परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, प्रा.सुनील गरुड, दीपक बंडू पाटील, रमेश शिंदे उपस्थित होते.