शिष्यवृत्तीच्या रकमेमुळे मिळाली विदेशात उच्च शिक्षणाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:15 AM2021-04-10T04:15:22+5:302021-04-10T04:15:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कामगार कल्याण योजनेंतर्गत कामगारांना विविध लाभ दिले जात असून, या अंतर्गत जळगावातील कंपनीमध्ये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कामगार कल्याण योजनेंतर्गत कामगारांना विविध लाभ दिले जात असून, या अंतर्गत जळगावातील कंपनीमध्ये कामगार असलेल्या रवींद्र चौधरी यांचा मुलगा सोमेश चौधरी याला उच्च शिक्षणासाठी ५० हजाराची शिष्यवृत्ती मिळाल्याने विदेशातील शिक्षणासाठी त्याला आधार मिळाला आहे. यासाठी पिंप्राळा येथील महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्राने पुढाकार घेत हा लाभ मिळवून दिला.
महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्राच्यावतीने कामगारांसाठी विविध आर्थिक योजना राबविल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून विदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्तीचा सोमेश चौधरी याला लाभ मिळाला असून, तो जर्मनी येथे उच्च शिक्षणासाठी गेला आहे. यासाठी त्याला कामगार कल्याण केंद्राच्यावतीने ५० हजाराची मदत करण्यात आली.
ऑनलाइन नोंदणीची सुविधा
कामगार कल्याण केंद्राच्यावतीने नोंदणीची ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली आहे. कामगार आता घरी बसून आर्थिक योजनांचा लाभ घेऊ शकत आहेत. यासाठी नोंदणी करताना कामगारांनी त्यांचा लिंक क्रमांक टाकणे आवश्यक असून, नोंदणी केलेल्या कामगारांना विविध योजनांचा लाभ घेता येत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन केंद्र संचालक मिलिंद पाटील यांनी केले आहे.