माजी विद्याथ्यानी शिष्यवृत्ती उपलब्ध करुन द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:41 PM2019-11-18T22:41:22+5:302019-11-18T22:41:32+5:30
जळगाव : माजी विद्यार्थ्यांनी संस्थेत शिक्षणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, रोजगाराच्या संधी, प्र शिक्षण या सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत असे ...
जळगाव : माजी विद्यार्थ्यांनी संस्थेत शिक्षणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, रोजगाराच्या संधी, प्रशिक्षण या सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत असे मत विद्यापीठाच्या लाईफ सायन्सेस प्रशाळेचे माजी संचालक प्रा.डॉ.व्ही.एल.माहेश्वरी यांनी व्यक्त केले़
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेतील १९९२-९४ मधील बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा रौप्यमहोत्सवा शनिवारी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात पार पडला़ त्याप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी डॉ.एस.टी.इंगळे, डॉ.सिमा जोशी, प्रा.राजेंद्र देशमुख, डॉ. सुभाष सोनवणे, डॉ.सुरेश टेकी, डॉ. अनिल डोंगरे, प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संजय पवार मंचावर उपस्थित होते. प्रा.डॉ.सिमा जोशी यांनीे अनुभव कथन केले.