नशिराबादला शाळेची घंटा वाजलीच नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:14 AM2021-07-17T04:14:40+5:302021-07-17T04:14:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नशिराबाद : नशिराबादला शाळा सुरू करण्याचे स्थानिक प्रशासनाकडून निर्देश नसल्याने विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षक शाळा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नशिराबाद : नशिराबादला शाळा सुरू करण्याचे स्थानिक प्रशासनाकडून निर्देश नसल्याने विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षक शाळा सुरू होतील की नाही याबाबत संभ्रमात आहे. या संभ्रमामुळे मात्र नशिराबादला शाळेची घंटा वाजलीच नाही.
प्रत्यक्ष शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गजबज दिसून आली नाही. नशिराबाद येथे नगरपंचायत झाल्याने सध्या प्रशासक म्हणून तहसीलदार हे कारभार बघत आहेत. त्यामुळे नशिराबाद अद्याप ग्रामीण की शहरी या द्विधा मनस्थिती प्रशासन असल्याने त्यांनी कुठलाही ठराव न करता शाळा सुरू करण्याची परवानगी दिलेली नाही.
-------------
नशिराबादला विद्यार्थिनीचा राजर्षी शाहू महाराज पुरस्काराने गौरव
नशिराबाद: येथील सर्वोदय माध्यमिक विद्यालयातील संजना संतोष मगरे हिने २०१९-२० या वर्षी इयत्ता १०वी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केल्यामुळे जळगाव सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्यावतीने ‘राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार’ देऊन नुकतेच गौरविण्यात आले. रु. ५ हजार धनादेशाच्या स्वरूपात समाज कल्याण विभागातील प्रतिनिधी तालुका समन्वयक महेंद्र डी. पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. या विद्यार्थिनीचे प्रगती शिक्षण मंडळ नशिराबादचे संस्थाध्यक्ष प्रा.डॉ.युवराज वाणी ,सचिव गोवर्धन पाटील, मुख्याध्यापिका स्नेहल वाणी यांनी अभिनंदन केले.
------------
मुक्तेश्वरनगरमध्ये नवीन पाण्याच्या टाकीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नशिराबाद : येथील मुक्तेश्वरनगर परिसराचा वाढता विस्तार लक्षात घेता येथे परिसरात नवीन पाण्याची टाकी उभारावी, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश महाजन यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.