शाळेचे बांधकाम अडकले लालफितीत

By admin | Published: April 20, 2017 12:33 AM2017-04-20T00:33:36+5:302017-04-20T00:33:36+5:30

बडवाणी : आठ वर्षांपासून सात लाखांचा निधी मंजूर, मात्र जागा उपलब्ध होत नसल्याने शाळा बांधकाम रखडले

School building stuck in redfish | शाळेचे बांधकाम अडकले लालफितीत

शाळेचे बांधकाम अडकले लालफितीत

Next

बिडगाव,ता.चोपडा : ग्रामीण भागातही खासगी शाळांच्या टोलेजंग इमारती उभ्या राहत असताना, अधिकाºयांच्या अनास्थेमुळे दुर्गम भागातील जि.प.शाळांची स्थिती काय आहे, हे बडवाणी (ता.चोपडा) येथील शाळेवरून लक्षात येते. जागा नसल्याचे कारण सांगून गेल्या आठ वर्षांपासून येथे शाळेची इमारतच बांधली गेली नाही. परिणामी विद्यार्थ्यांना कुडाच्या खोलीत बसूनच ज्ञानार्जनाचे काम करावे लागत आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले बडवाणी (ता.चोपडा) हे शंभर टक्के आदिवासी गाव. येथे पूर्वी वस्ती शाळा होती. मात्र, शासनाच्या नियमानुसार या शाळेचे जि.प.शाळेत रूपांतर झाले. येथे पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असून, ४२ विद्यार्थी शिक्षण घेत असतात.
 परिसरातील अनेक वस्ती शाळांचे जि.प.शाळामध्ये रूपांतर झाले. त्या शाळांना इमारती बांधण्यात आल्या. मात्र येथे शाळा खोल्या बांधण्यात न आल्याने, पहिली ते चौथीपर्यंतचे सर्व विद्यार्थी एका झोपडीत बसूनच विद्यार्जनाचे काम करीत असतात.
एकीकडे शासन जि.प.शाळा डिजिटल करण्यासाठी करोडो रुपये खर्च करीत आहे. मात्र अधिकाºयांच्या हलगर्जीपणाने टोलवाटोलवी करत असल्याने शाळेसाठी जागा मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी  शाळेचे बांधकाम व्हावे, अशी  पालकांची अपेक्षा आहे.
वनविभागाकडून अडचणी : पवार
 बडवाणी शाळेच्या इमारतीच्या जागेसाठी गावठाण जागा नसल्याने वनविभागाकडे अनेक वेळा प्रस्ताव पाठवले. मात्र किरकोळ तांत्रिक अडचणी दाखवत ते जागा देण्यात अडथळा आणतात, असे गटशिक्षणाधिकारी एस.सी.पवार यांनी सांगितले.
वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवला:काझी
शिक्षण विभागाकडून आम्हाला प्रस्ताव मिळाला आहे. आम्ही तो वरिष्ठ अधिकाºयांकडे पाठवला आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर बडवाणी शाळेसाठी जागा देऊ, असे देवझिरी क्षेत्राचे वनक्षेत्रपाल काझी यांनी सांगितले.
आमदारांच्या प्रयत्नांनी
जागा मिळवू- मुख्याध्यापक
वनविभागाकडून इमारतीच्या बांधकामासाठी जागेबाबत प्रस्ताव पाठवले आहेत.
आमदारांनीही यात लक्ष घातले असून त्यांच्या प्रयत्नांनी जागा मिळवून देऊ, असे मुख्याध्यापक चंद्रशेखर साळुंखे यांनी सांगितले.
        (वार्ताहर)

Web Title: School building stuck in redfish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.