शाळा बंंद, पण विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:11 AM2021-06-30T04:11:07+5:302021-06-30T04:11:07+5:30
येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी, शाळा बंद असली तरी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन इ. ५ वी ते इ.८ वी ...
येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी, शाळा बंद असली तरी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन इ. ५ वी ते इ.८ वी पर्यंतच्या वर्गातील सर्व विषयांची क्रमिक पुस्तकांचे वाटप केले.
शिक्षकांनी शाळा सुरू दिवसापासूनच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देणे सुरू केलेले आहे; परंतु विषयाची पाठ्यपुस्तकं जवळ असली म्हणजे ऑनलाइन अभ्यास समजण्यास अधिक सोपे जाते, शिवाय ज्या विद्यार्थ्याजवळ ॲण्ड्राईड मोबाइल नाही अशा विद्यार्थ्यांना पाठविलेली सुलभ प्रश्नावली घरी बसून सोडविणे कामी पाठ्यपुस्तक उपयोगी पडते. स्वत:शिक्षक घरी येऊन पाठ्यक्रमिक पुस्तकांचा संच देत असल्याने पालक व विद्यार्थ्यी वर्गात आनंदी व उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.
मुख्याध्यापक व्ही.टी.इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.डी.जाधव, आर.डी.चौधरी, डी.डी.राजपूत, राजेंद्र सूर्यवंशी इ.शिक्षक स्वत:च्या चारचाकी वाहनातून घरोघरी व परिसरातील वासरे, पाडळसे, निम इ.गावांत कोरोना नियमावलीचे पालन करून घरपोच पाठ्यपुस्तके वाटप करीत आहेत. मोफत पाठ्यपुस्तकं मिळाल्याने तेवढाच आर्थिक भार कमी झाला आहे.