शासकीय तंत्रनिकेतन राबविणार स्कूल कनेक्ट उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 08:42 PM2019-11-23T20:42:39+5:302019-11-23T20:42:49+5:30
जळगाव - तंत्रनिकेतन अभ्यासक्रमासह विविध अभ्यासक्रम, त्यातील प्रवेश प्रक्रिया, प्रवेश प्रक्रियेची माहिती, रोजगाराची संधी यावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी शहरातील ...
जळगाव- तंत्रनिकेतन अभ्यासक्रमासह विविध अभ्यासक्रम, त्यातील प्रवेश प्रक्रिया, प्रवेश प्रक्रियेची माहिती, रोजगाराची संधी यावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयतर्फे स्कूल कनेक्ट उपक्रम हाती घेण्यात आला आहे़ या उपक्रमातंर्गत शाळांमध्ये विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन केले जाणार आहे़
कला, विज्ञान, वाणिज्य शाखांतून पदवी शिक्षण घ्यावे की अभियांत्रिकी, वैद्यकीय, चार्टड अकाउंटंट पदवी घ्यावी असा गोंधळ नेहमीच विद्यार्थ्यांचा असतो़ त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शंका व त्यांना उद्धभवणाऱ्या समस्यांचे निरासन करण्यसाठी व तंत्रशिक्षण पदविकास अभ्यासक्रमाची ओळख व्हावी, यासाठी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातर्फे स्कूल कनेक्ट हा उपक्रम होती घेण्यात आला आहे़ हा उपक्रम जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये राबविण्यात येणार असून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे़ दरम्यान, या उपक्रमातंर्गत जिल्ह्यातील विविध शाळांची निवड करण्यात आली आहे़ त्याठिकाणी विद्यार्थ्यांना पीपीटीद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे़