३५० प्राण्यांची भरली शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:18 PM2020-02-24T23:18:23+5:302020-02-24T23:18:43+5:30

‘प्राणी जगत’ : अन् विद्यार्थी अनुभवताय ‘जंगल सफारी’

 A school full of animals | ३५० प्राण्यांची भरली शाळा

३५० प्राण्यांची भरली शाळा

Next

जळगाव- विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित ‘प्राणी जगत’ या प्रकल्पाचे सोमवारी सकाळी वन विभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांच्याहस्ते उद्घाटन झाले़ या प्रकल्पातंर्गत ३५० पेक्षा अधिक विविध प्रकारचे सजीव, किटक,पाळीव प्राणी तसेच जंगली प्राणी आणि पक्षांच्या प्रतिकृती बनविण्यात आली आहे़ त्यामुळे जणू काही स्कूलमध्ये प्राण्यांची शाळाच भरली की काय असा अनूभव विद्यार्थ्यांना बघायला मिळत आहे़ त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पृथ्वीची उत्पत्ती आणि प्राणी जगताची माहिती दिली जात आहे़

विद्यार्थ्यांना प्राणी जगताचे सखोल ज्ञान व्हावे व प्राणी, पशु, पक्षी, कीटक, पर्यावरण वाचवा असा संदेश जनतेपर्यंत पोहचावा या उद्देशाने विवेकानंद इंग्लिश स्कूल येथे दोन दिवसीय प्राणी जगत या वार्षिक प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी शोभा पाटील, रत्नाकर गोरे व ज्ञानेश्वर पाटील व सविता कुलकर्णी आदींची उपस्थिती होती़ दरम्यान, या प्रकल्पांतर्गत शाळेतील शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेली सुमारे ३५० पेक्षा जास्त प्राण्यांची प्रतिकृती आणि अनेक सजीवांबद्दलची माहिती असलेले पोस्टर स्कूलच्या आवारात ठेवण्यात आले आहे़ त्यामुळे जंगल सफारी ही विद्यार्थ्यांना शाळेमध्येच अनुभवायल मिळत आहे़

तर पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली विद्यार्थ्यांनी घेतले जाणून
दरम्यान, प्रकल्पातंर्गत शाळेमध्ये सुमारे ८ विभाग करण्यात आले आहे. पहिल्या विभागात सुर्यांपाून पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, पृथ्वीवर पहिला सजीव कसा आला याबद्दल माहिती प्रोजेक्टर व पोस्टर्सच्या माध्यामातून दाखविली जात आहे़ डायनासोरचे विविध पोस्टर्स लावण्यात आले आहे़ दुसऱ्या विभागात जलचर प्राण्यांबद्दलची माहिती समुद्र व नदीच्या प्रतिकृतीतून दिली गेली. यामध्ये मगर, खेकडा, कासव, डॉल्फिन, शार्क अशी सुमारे ७५ जलचर प्राण्यांच्या प्रतीकृती तयार करण्यात आलेल्या आहेत़ तिसºया विभागात जंगली प्राण्यांसंर्भात सुमारे ३० विविध पोस्टर्स छायाचित्रे व प्रतिकृती उभारण्यात आले असून त्यामध्ये वाघ, सिह, हत्ती, उंट, जिराफ, कांगारू, माकड आदी तर चौथ्या विभागात सर्व पाळीव प्राण्यांबद्दल यामध्ये गाय , म्हैस, कुत्रा, मेंढी, घोडा यासह सुमारे २० विविध प्राणी. पाचवा विभाग हा पक्षी प्रदर्शनीचा असून यामध्ये भारतीय, महाराष्ट्रीयन व आंतरराष्ट्रीय पक्षी जसे की चिमणी, कावळा, पोपट, कोकिळा एशियन कोयल अशी सुमारे ७० पक्ष्यांबद्दल माहिती दिली गेली आहे. तसेच सहाव्या विभागात किटकांबद्दलची तर सातव्या सातव्या विभागात विद्यार्थी व पालकांनी बनविलेल्या विविध मॉडेल्स, तक्ते व चित्रे याची प्रदर्शनीची मांडणी करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे १०० मॉडेल्स ठेवण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी प्राण्यांची वेशभूषा साकारली होती़ सूत्रसंचालन पूजा चंदनकर यांनी ३५० प्राण्यांची भरली शाळा
विक ज्ञानेश्वर पाटील यांनी केल़ प्रकल्पाचे संपूर्ण नियोजन प्रकल्प प्रमुख वैशाली चौधरी व सविता कुलकर्णी यांनी केले.

Web Title:  A school full of animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.