लगAाला जाणारा विद्यार्थी महामार्गावर जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2017 01:27 AM2017-02-20T01:27:05+5:302017-02-20T01:27:05+5:30

एकलगA गावानजीक ट्रकची धडक : एरंडोल येथील दोन चुलत भाऊ गंभीर जखमी दुचाकीवरुन जात होते ट्रीपल सीट

A school going to be killed on the highway | लगAाला जाणारा विद्यार्थी महामार्गावर जागीच ठार

लगAाला जाणारा विद्यार्थी महामार्गावर जागीच ठार

Next

जळगाव : मित्राच्या बहिणीच्या लगAासाठी जळगावात आलेल्या प्रवीणकुमार मिश्रा (वय 18 रा.जागनपुर, ता.दसरा, अलाहाबाद, उत्तरप्रदेश) या विद्याथ्र्याचा रविवारी दुपारी साडे तीन वाजता राष्ट्रीय महामार्गावर एकलगA गावाजवळ चारचाकीवाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला. नरेश नाना सोनवणे (वय 19) व दीपक संजय सोनवणे (वय 22) दोन्ही रा.जहांगीरपुरा, एरंडोल हे दोन्ही चुलत भाऊ जखमी झाले आहेत. तिघंही जण एकाच दुचाकीने जळगाववरुन एरंडोलला जात होते.
लगAाची खरेदी व प्रवीणकुमारला घेण्यासाठी आले होते दोघेभाऊ
याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, दीपक सोनवणे याच्या बहिणीचे सोमवारी एरंडोल येथे लगA आहे. रविवारी संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम होता.लगAाची काही खरेदी व प्रवीणकुमार याला रेल्वे स्टेशनवर घेण्यासाठी दोन्ही चुलत भाऊ दुचाकीने (क्र.एम.एच.19 ङोड 0325) जळगाव येथे आले होते. खरेदीकेल्यानंतरवप्रवीणकुमारलासोबतघेऊनएरंडोलकडे जात असताना महामार्गावर एकलगA गावाच्या अलीकडे समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करताना समोरुन येणा:या आयशरचा दुचाकीला धक्का लागला. त्यात तिघंही दुचाकीसह रस्त्याच्या कडेला फेकले गेले. सर्वात मागे बसलेल्या प्रवीणकुमार याच्या डोक्याला जबर मार बसल्याने तो जागीच ठार झाला.
आरोग्य सेवकाने हलविले दवाखान्यात
या अपघाताच्यावेळीच रस्त्याने जाणारे तळई प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यसेवक अतुल सोनवणे यांनी थांबून अपघाताची माहिती पोलिसांना कळवली व रुग्णवाहिका बोलावून घेतली. सहायक पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांच्या मदतीने तिघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रवीणकुमार याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. त्याच्या खिशातील आधारकार्डमुळे मयताची ओळख पटली. दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच सोनवणे यांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी जिल्हा रुग्णालयात जमा झाली होती.
प्रवीणकुमार परीक्षा देऊन आला लगAाला
प्रवीणकुमार याच्या नातेवाईकांनी सुरत येथून ‘लोकमत’ दिलेल्या माहितीनुसार प्रवीण व अपघातातील जखमी तिघं जण सुरतला कामाला आहेत.  प्रवीणकुमार हा पदवीच्या प्रथम वर्षाच्या परीक्षेसाठी अलाहाबाद येथे 29 जानेवारी रोजी गेला होता. परीक्षा संपल्यानंतर दीपकच्या बहिणीच्या लगAासाठी तो रेल्वेने जळगावात आला. दीपक व नरेश हे दोघं जण त्याला रेल्वे स्टेशनवर घ्यायला गेले होते.
 लगAाचीही खरेदी असल्याने काम आटोपून तिघंही एकाच दुचाकीने एरंडोलकडे रवाना झाले. सोनवणे बंधूनी मात्र प्रवीणकुमार याला आम्ही ओळखत नाही. भाडय़ाला पैसे नसल्याचे सांगून तो गुजराल पेट्रोलपंपाजवळून आमच्या दुचाकीवर मुसळी फाटय़ार्पयत येण्यासाठी बसल्याचे सांगितले. दरम्यान, प्रवीणकुमार याचे नातेवाईक सुरत व अहमदाबाद येथून जळगावसाठी रवाना झाल्याची माहिती पाळधी पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक विजय देशमुख यांनी दिली.
महामार्गावर वाढते अपघात व त्यामुळे जीव जाणा:यांची संख्या पाहता पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी महामार्ग व राज्य मार्गावर 17 फेब्रुवारीपासून हेल्मेट व कारला सीटबेल्ट सक्ती केली आहे. असे असतानाही या अपघातातील तिघं तरुणांकडे हेल्मेट नव्हते. प्रवीणकुमार याच्याकडे हेल्मेट राहिले असते तर त्याचा नक्कीच जीव वाचला असता. डोक्याला मार लागल्यामुळेच त्याचा बळी गेला आहे.
अपघातात ठार झालेला प्रवीण हा सुरतला येण्यासाठी अलाहाबाद येथून निघाला होता. मात्र मध्येच तो जळगावला उतरला. सुरत येथील नातेवाईकांना तो जळगावला जाणार होता याची कल्पनाही नव्हती, असे सुरतच्या नातेवाईकांनी सांगितले. जळगावला न येता तो सुरतला गेला असता तर त्याचा जीव वाचला असता. सुरतला तो भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करायचा.
महामार्गावर अपघातांची मालिका
महामार्गाची व साईडपट्टय़ांची झालेली दैनामुळे दररोज अपघात होत आहेत. खोटेनगरनजीक सलग दोन दिवस अपघात झाले. फागणे गावाजवळ तसेच मतदानाला जाण्या:या दाम्पत्याचाही 16 तारखेला अपघात झाला होता.  यानंतर आज पुन्हा एकलगAानजीक अपघात झाला. जीव गमवावा लागला.

Web Title: A school going to be killed on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.