जळगाव जिल्ह्यात 19 दिवसांपासून शालेय आरोग्य तपासणी तपासणी ठप्पच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 11:21 PM2017-09-19T23:21:09+5:302017-09-19T23:22:20+5:30
आरोग्य : वाहनांसाठी बुधवारी निविदा उघडणार
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 19 - राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत शालेय विद्याथ्र्याच्या आरोग्य तपासणीसाठी असलेल्या पथकांच्या वाहनांसाठी राबविण्यात आलेल्या लघु निविदा प्रक्रियेतील निविदा 20 रोजी उघडल्या जाणार आहेत. दरम्यान, निविदा प्रक्रिया रखडल्याने वाहनांअभावी 1 सप्टेंबरपासून ठप्प झालेली शालेय आरोग्य तपासणी 19 दिवसानंतरही सुरळीत झालेली नाही.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र सरकारच्यावतीने अंगणवाडी, शाळा, आश्रमशाळांमधील 16 वर्षे वयोगटार्पयतच्या विद्याथ्र्यांच्या आरोग्य तपासणीसाठी राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम राबविला जातो. यातील पथकाला देण्यात येणारे वाहन कंत्राटी पद्धतीवर लावले जातात. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात लावण्यात आलेल्या वाहनांचा कंत्राट एप्रिल महिन्यातच संपला. मात्र निविदा न काढल्यामुळे संबंधित कंत्राटदाराला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. ती मुदतदेखील 31 ऑगस्ट रोजी संपली. त्यानंतर आलेल्या दोन निविदा उघडण्यात आल्या ख:या मात्र त्याही रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे लघु निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.
यामध्ये आलेल्या निविदा बुधवार, 20 रोजी उघडल्या जाणार असून त्यानंतर कार्यादेश दिले जातील. मात्र ही प्रक्रिया पूर्ण होईर्पयत शालेय आरोग्य तपासणी ठप्पच राहणार असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत शालेय विद्याथ्र्याच्या आरोग्य तपासणीसाठी असलेल्या पथकांच्या वाहनांसाठी राबविण्यात आलेल्या लघु निविदा प्रक्रियेतील निविदा 20 रोजी उघडण्यात येणार आहे.
- डॉ.एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक.