शालेय पोषण आहार उघड्यावर शिजवणे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 08:26 PM2019-01-04T20:26:47+5:302019-01-04T20:33:10+5:30
विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यासाठी शालेय पोषण आहाराची सोय शासनाने केली आहे. परंतु शालेय पोषण आहार बहुतांश शाळांमध्ये उघड्यावर शिजविला जात होता, यातूनच प्रत्येक शाळेला किचनशेड असावे अशी संकल्पना पुढे आणून जिल्ह्यातील काही शाळांमध्ये किचनशेड तयार करण्यात आले. काही शाळांमध्ये फायब्रिकेडेड रेडिमेड किचनशेड उपलब्ध करून देण्यात आले.
अजय कोतकर
गोंडगाव, ता.भडगाव : विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यासाठी शालेय पोषण आहाराची सोय शासनाने केली आहे. परंतु शालेय पोषण आहार बहुतांश शाळांमध्ये उघड्यावर शिजविला जात होता, यातूनच प्रत्येक शाळेला किचनशेड असावे अशी संकल्पना पुढे आणून जिल्ह्यातील काही शाळांमध्ये किचनशेड तयार करण्यात आले. काही शाळांमध्ये फायब्रिकेडेड रेडिमेड किचनशेड उपलब्ध करून देण्यात आले. जिल्ह्यातील १८३२ शाळांपैकी १४७९ शाळांत किचनशेड पूर्ण झाले आहेत. उर्वरित केव्हा होणार यासाठी प्रतीक्षा लागून आहे.
जिल्ह्यात १८३२ शाळांत किचनशेड तयार करण्याची संकल्पना शिक्षण विभागाने आखली, परंतु त्यात जागेअभावी १४७९ शाळेतच फायब्रिकेडेड किचनशेड तयार करण्यात आले, तर उर्वरित शाळांमध्ये सिमेंट काँक्रिटचे किचनशेड आहेत.
तालुका शाळासंख्या फायब्रिकेडेड
किचनशेड संख्या
चाळीसगाव १९० १७९
भडगाव ९४ ७३
पाचोरा १५२ १२०
अमळनेर १३३ १०१
चोपडा १३९ ११२
भुसावळ ६६ ४४
बोदवड ५२ ४८
धरणगाव ९१ ६७
एरंडोल ८४ ६०
जळगाव १०७ ७५
जामनेर २०८ १८०
मुक्ताईनगर १०८ ५४
पारोळा ११८ ९३
रावेर १५० १४१
यावल १४० १३१
दैनंदिन पोषण आहार मेनू असा
सोमवार- वरणभात (पूरक आहार केळी बिस्कीट, राजगिरा लाडू)
मंगळवार- वटाणा/चवळी उसळ भात
बुधवार- तूर डाळ/मसूर डाळीचे फोडणीचे वरणआणि भात
गुरुवार- मटकी, उसळ, भात
शुक्रवार- हरभरा, उसळ, भात
शनिवार- तूर डाळ/मसूर डाळ तांदूळ टाकून खिचडी