शालेय पोषण आहाराचे गौडबंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:10 AM2019-06-23T00:10:58+5:302019-06-23T00:11:37+5:30

खुलाशाची प्रतीक्षा

School Nutrition Dosage | शालेय पोषण आहाराचे गौडबंगाल

शालेय पोषण आहाराचे गौडबंगाल

Next

विजयकुमार सैतवाल
जळगाव : जिल्हा परिषदेच्या शालेय पोषण आहार पुरविण्यात झालेल्या अपहार प्रकरणी मक्तेदारास बजावण्यात आलेल्या नोटीसीनंतर मक्तेदाराने एक लाख ६७ हजारांचा धनादेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात जमा केला असला तरी अद्याप आपले म्हणणे सादर केलेले नाही. या प्रकरणाच्या खुलाशाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या गौडबंगाल काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जिल्हा परिषदेत शालेय पोषण आहार पुरविण्यासाठी मे. साई मार्केटिंग अ‍ॅण्ड कंपनी, पाळधी (ता. धरणगाव) या संस्थेस मक्ता देण्यात आला होता. जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७ दरम्यान जिल्ह्यातील जळगाव, भडगाव, मुक्ताईनगर, चाळीसगाव या चार तालुक्यांतील २१ शाळांच्या पुरवठ्यात अनियममितता आढळून आली होती. याबाबत रवींद्र शिंदे यांनी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार दिवेगावकर यांनी चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी अहवालात चारही तालुक्यांतील शाळांमध्ये पोषण आहार पुरविण्यात एक लाख ६७ हजारांचा अपहार झाल्याचे म्हटले होते. या अहवालानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या आदेशानुसार मक्तेदारास म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती.
त्यानंतर मक्तेदार साई मार्केटिंग अ‍ॅण्ड कंपनीने (पाळधी, ता. धरणगाव) एक लाख ६७ हजार १४ रुपयांचा धनादेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शालेय शिक्षण विभागाच्या रोखपालांकडे जमा केल्याचे सांगण्यात आले. रकमेचा धनादेश दिला असला तरी नोटीस दिल्यानंतर मक्तेदाराचे म्हणणे सादर न झाल्याने त्याची प्रतीक्षा आहे. मुक्तेदाराचे म्हणणे सादर होत नसल्याने वेगवेगळी चर्चा रंगत आहे.

Web Title: School Nutrition Dosage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव