शालेय पोषण आहाराची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 07:53 PM2018-08-25T19:53:38+5:302018-08-25T19:53:59+5:30

अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील घटना : शाळेतून २३ हजारांचा माल लंपास

School nutrition theft | शालेय पोषण आहाराची चोरी

शालेय पोषण आहाराची चोरी

googlenewsNext

अमळनेर, जि.जळगाव : तालुक्यातील लोंढवे येथील एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून २३ हजार रुपये किमतीचा शालेय पोषण आहार व तत्सम साहित्य लंपास केले.
मध्यरात्री लोंढवे माध्यमिक विद्यालयात चोरट्यांनी बंद खोलीचे कुलूप तोडून नऊ क्विंटल तांदळासह इतर ५० किलो मठ, २१ किलो मूग, चार किलो जिरे, दोन किलो मिरची पावडर असे एकूण अंदाजे २३ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरीस गेल्याची खबर शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब जीवन पाटील यांनी अमळनेर पोलिसांना दिली.
या वेळी प्रभाकर पाटील, रवी पाटील, राजेश चव्हाण यांनी घटनास्थळी पंचासमक्ष पंचनामा केला. दिलीप गुलाबराव पाटील यांंनी फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर पाटील करीत आहे.

Web Title: School nutrition theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.