विषयतज्ज्ञांनी भरविली हजेरीत ‘शाळा’
By admin | Published: May 24, 2017 12:48 PM2017-05-24T12:48:22+5:302017-05-24T12:48:22+5:30
विषय तज्ज्ञ, गट शिक्षणाधिका:यांकडून दिशाभूल : जिल्ह्यात 78 विषय तज्ज्ञ
Next
ऑनलाईन लोकमत विशेष /अजय पाटील
जळगाव, दि.24- शासनाकडून कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केलेल्या विषयतज्ज्ञांकडून 15 अजिर्त सुटय़ा न घेतल्याचे दाखवून शासनाचे अनुदान लाटण्याचा प्रकार सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
शाळांमध्ये प्रगत शैक्षणिक उपक्रमांतर्गत विद्याथ्र्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे, शाळांना भेटी देऊन शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेची माहिती शिक्षण विभागाकडे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून विषयतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात 78 विषय तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. विषय तज्ज्ञांची नेमणूक ही कंत्राटी पध्दतीने करण्यात आली असून, डाएटच्या माध्यमातून विषयतज्ज्ञांचे वेतन अदा केले जात असते.
हजेरी पत्रकावर दाखविली जाते खोटी हजेरी
सहा महिन्यांसाठी नियुक्ती विषय तज्ज्ञांना 15 दिवसाच्या अर्जित सुटय़ा मंजूर आहेत. त्यात 15 दिवसाच्या वर सुट्टी घेतल्यास वेतनातून कपात केली जात आहे. मात्र अर्जित केलेल्या 15 दिवसांपैकी काही सुटय़ा शिल्लक असल्यास त्या सुटय़ांचे वेतनदेखील मिळत असते. मात्र अनेक विषय तज्ज्ञांकडून 15 दिवसाच्या सुटय़ा घेतल्यावर सुध्दा हजेरीपत्रकावर 15 दिवस सुट्टी न घेतल्याची माहिती दिली जात आहे. 15 दिवसासाठी मिळणारे 13 हजार 961 रुपये विषयतज्ज्ञांना प्राप्त होत आहे. सहा महिन्याचा काळात विषय तज्ज्ञ एकही सुट्टी घेत नाहीत का ? असा प्रश्न यामुळे निर्माण होतो.
गटशिक्षणाधिका:यांसोबत संगनमत
विषय तज्ज्ञांची हजेरी पुस्तक हे तालुक्याचा ठिकाणी असलेल्या गट साधन केंद्रावर उपलब्ध करून दिले आहे. या ठिकाणी विषय तज्ज्ञ आपली हजेरीची माहिती देत असतात. त्यानंतर गट शिक्षणाधिका:यांकडून या हजेरीपत्राची तपासणी करून वेतनासाठी डाएट च्या प्राचार्याकडे दिली जाते. डाएट प्राचार्यानी हजेरीपत्रावर सही केल्यानंतर विषय तज्ज्ञांचे वेतन केले जात असते. गट शिक्षणाधिका:यांसोबत संगनमत करीत हा प्रकार सुरु असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.
शिक्षण विभाग, डाएट कडून टोलवाटोलवी
प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी विषय तज्ज्ञांच्या वेतनाची जबाबदारी डाएट कडे असल्याचे सांगितले. तर डाएटचे प्राचार्य अनिल सोनार यांनी हजेरी पत्राची संपूर्ण माहिती ही गट शिक्षणाधिका:यांकडून येत असल्याचे सांगितले. तसेच गट शिक्षणाधिकारीच विषय तज्ज्ञांच्या हजेरीची शहानिशा करतात. त्यांनी पाठविलेल्या माहितीच्या आधारावरच विषय तज्ज्ञांचे वेतन दिले जात असल्याची माहिती प्राचार्य सोनार यांनी दिली.