शालेय विद्यार्थ्यांना दूधासाठी अजून महिनाभर वाट पहावी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 10:04 PM2017-11-06T22:04:04+5:302017-11-06T22:05:12+5:30
जिल्'ातील जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना १ नोव्हेंबर पासून दूध वितरीत केले जाणार असल्याची घोषणा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली होती. मात्र जिल्हा दूध संघाकडून ‘एनडीडीबी’कडेशाळांचे प्रस्ताव पाठविण्यास उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना दूधासाठी अजून महिनाभर वाट पहावी लागणार आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.६-जिल्'ातील जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना १ नोव्हेंबर पासून दूध वितरीत केले जाणार असल्याची घोषणा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली होती. मात्र जिल्हा दूध संघाकडून ‘एनडीडीबी’कडेशाळांचे प्रस्ताव पाठविण्यास उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना दूधासाठी अजून महिनाभर वाट पहावी लागणार आहे.
गुजरात येथील आनंद शहरातील ‘आनंद दूध डेअरी’ला नुकतेच ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्तडेअरीकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी 'स्वीट मिल्क' हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमातंर्गत शासकीय शाळांच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी २०० मीली दूध देण्यात येणार होते. तशी माहिती आनंद डेअरीकडून जिल्हा दूध संघ व जि.प.शिक्षण विभागाला देण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेकडून दूध संघाने या उपक्रमाबाबत मंजुरीचे पत्र देखील प्राप्त केले होते.
जि.प.कडून मंजुरी मिळाल्यानंतर जिल्हा दूध संघाला एन.डी.डी.बी.कडे शाळांचा प्रस्ताव पाठवायचा होता. प्रस्ताव पाठविल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत विद्यार्थ्यांना दूध वितरीत होणार होते. याबाबतमाजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी १ नोव्हेंबरपासून दूध वितरीतहोणार असल्याचे शिक्षकपुरस्कारवितरणसोहळ्याप्रसंगीजाहीर केले होते. मात्र दूध संघाने हा प्रस्ताव पाठविण्यास उशीर केल्याने १ नोव्हेंबर रोजी दूध वितरणाचा मुहूर्त हुकला आहे. आता विद्यार्थ्यांना दूधा साठी अजून महिनाभर तरी वाट पहावी लागणार आहे.
१० हजार विद्यार्थ्यांना मिळणार दूध
या उपक्रमातंर्गत जि.प.शाळेतील १० हजार विद्यार्थ्यांना दूध वितरीत केले जाणार आहे. शाळांची निवड आनंद डेअरीच्या अधिकाºयांकडून केली जाणार आहे. जिल्'ातील ज्या शाळांपर्यंत वाहतूक सोईस्कर होवू शकते अशा गावांमधील शाळांची निवड या उपक्रमासाठी करण्यात येणार आहे. सुरुवातीला जिल्'ातील १० हजार विद्यार्थ्यांना हे दूध वाटप केले जाईल. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने जिल्'ातील विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे.
कोट...
जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना दूध वितरीत केले जाणार होते. याबाबत १ नोव्हेंबरची तारीख ठरली होती. मात्र जिल्हा दूध संघाकडून प्रस्ताव पाठविण्यास थोडा उशीर झाला आहे. मात्र आता प्रस्ताव पाठविला असून लवकरच विद्यार्थ्यांना दूध वितरीत केले जाणार आहे.
-मनोज लिमये, व्यवस्थापकीय संचालक,जिल्हादूधसंघ
आनंद डेअरीला ७५ वर्ष पूर्ण होणार असल्याने जिल्हा दूध संघाच्या माध्यामातून शाळांमध्ये दूध वितरीत होणार आहे. जि.प.शिक्षण विभागाने आपला प्रस्ताव दूध संघाकडे पाठविला आहे. सध्या दूध वितरणाची काय स्थिती आहे, याबाबत दूध संघाच्या अधिकाºयांशी चर्चा करून माहिती घ्यावी लागणार आहे.
-पोपटराव भोळे, शिक्षणसमिती,सभापती,जि.प.