टाकळीच्या शाळेचा लोकसहभागातून कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 07:08 PM2018-11-20T19:08:59+5:302018-11-20T19:10:38+5:30
जामनेर : टाकळी खुर्द, ता. जामनेर येथील जि.प.शाळेच्या नुतनीकरणासाठी शिक्षक व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. लोकसहभागातून समाजपयोगी कामे करण्याचा संकल्प ...
जामनेर : टाकळी खुर्द, ता.जामनेर येथील जि.प.शाळेच्या नुतनीकरणासाठी शिक्षक व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. लोकसहभागातून समाजपयोगी कामे करण्याचा संकल्प केला आहे.
दिवाळी साजरी न करता गावात लोकवर्गणी जमा करुन गावात लोकसहभागाची मोठी चळवळ सुरू झाली. सदाशिव चवरे, अरुण सातव, संतोष अहिरे, प्रवीण तायडे आदींनी पहिल्या टप्प्यात शाळा इमारतीचे रंगकाम सुरू केले. परगावी राहणाऱ्या गावातील नागरीकांचा लोकसहभाग असावा म्हणून आॅनलाइन मनी ट्रान्सफर सुविधा राजू मोरे यांनी उपलब्ध करून दिली.
शाळेच्या भिंतीवर अनेक प्रकारची सकारात्मक छायाचित्रे रेखाटली गेली आहेत. यामध्ये राष्ट्रीय प्रतिके, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, राष्ट्रभक्तीचे संदेश, जनजागृतीचे संदेश, महापुरुषांच्या गाथा, विविध प्राण्याची चित्रे, भौगोलिक माहिती, यामुळे सर्व भिंती बोलक्या झाल्या. स्थानिक चित्रकार सुभाष राऊत यांनी यासाठी मेहनत घेतली. ३ जानेवारीपर्यंत काम पुर्ण करण्याचा ग्रामस्थांचा संकल्प आहे.