विठ्ठलनामाची शाळा भरली...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:12 AM2021-07-21T04:12:52+5:302021-07-21T04:12:52+5:30
जळगाव : हरिनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा नाद, विठ्ठल नामाचा जयघोष करीत शाळेच्या मैदानावर पायी निघालेले वारकरी शिक्षक...विठ्ठल-रखुमाईच्या वेषातील बाळगोपाळ...असे ...
जळगाव : हरिनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा नाद, विठ्ठल नामाचा जयघोष करीत शाळेच्या मैदानावर पायी निघालेले वारकरी शिक्षक...विठ्ठल-रखुमाईच्या वेषातील बाळगोपाळ...असे विठ्ठलभक्तीत तल्लीन झालेले हे दृश्य मंगळवारी शहरातील काही शाळांमध्ये दिसले. तर काही शाळांमध्ये ऑनलाईन आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.
किलबिलमध्ये भरला विद्यार्थ्यांचा आषाढ मेळावा (फोटो)
केसीई सोसायटी संचलित किलबिल बालक मंदिरात विद्यार्थ्यांचा आषाढ मेळावा भरला होता. यात विठ्ठलाच्या रूपात हेरंब कोल्हे तर रूख्मिणीच्या रूपात मनश्री कोलते व संत तुकारामांच्या वेषात राज पाटील, संत मुक्ताबाई साक्षी भगत व एकनाथांच्या वेषात हर्ष साळी हे विद्यार्थी होते. सुरूवातील डिगंबर कोल्हे यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शालेय समन्वयक चंद्रकांत भंडारी, मुख्याध्यापिका मंजुषा चौधरी, अर्चना चौधरी, रत्नप्रभा नेमाडे, कुंदा भारंबे आदींची उपस्थिती होती.
००००००००००००००००००००
विद्यार्थ्यांनी साकारली विठ्ठल-रुक्मिणी वेशभूषा (फोटो)
सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पाऊले चालती पंढरीची वाट या कार्यक्रमाचे आयोजन सुवर्णलता अडकमोल यांनी केले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात विठ्ठल रुक्मिणी वेशभूषेत किर्तन, भजन, कविता सादर केली. पालखी बनवून मिरवणूक काढण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील, संचालिका प्रतीक्षा पाटील, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका कल्पना वसाने, माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका दिपाली देवरे यांचे मार्गदर्शन लाभले़ दरम्यान, कार्यक्रमाप्रसंगी पार्थ जगताप, कुणाल वाडीले, कुणाल तायडे, वैष्णवी बारी, पुनम पाटील, साक्षी बारी, रोशनी बारी, नम्रता बारी, भाग्यश्री अहिरे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे भजन सादर केले.
०००००००००००००००
परशुराम विठोबा पाटील विद्या मंदिर (फोटो)
गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील विद्या मंदिर येथे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी, शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या हस्ते विठ्ठल- रुक्मिणी यांच्या पालखीचे पूजन झाले. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वेशभूषा साकारल्या होत्या. उपशिक्षक योगेश भालेराव, सूर्यकांत पाटील, स्वाती पाटील यांनी माहिती दिली. विठ्ठलाची भूमिका खैरनार हिने तर रुक्मिणीची सोनम देवरे या विद्यार्थिनीने वेशभूषा साकारली होती. गौरांक थोरवे याने संत ज्ञानेश्वर तर संत मिराबाई यांची अनुष्का पाटील तसेच संत मुक्ताबाई यांची मानसी बारी हिने वेशभूषा साकारली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरला पाटील, कल्पना तायडे, धनश्री फालक, दीपाली चौधरी, अशोक चौधरी, सुनील नारखेडे, सुधीर वाणी आदींनी परिश्रम घेतले.
०००००००००००००००
टाळ-मृदंगाचा नाद (फोटो)
वर्धमान यूनिवर्स अकॅडमी सीबीएसई इंग्लिश मिडियम स्कूल येथे आषाढी एकादशीनिमित्त सुंदर देखावा तयार करण्यात आला होता. संस्थाअध्यक्ष नरेंद्र मोदी तसेच मुख्याध्यापक डॉ.आशिष अजमेरा व ललिता अग्रवाल, विनिता खडसे यांच्या हस्ते विट्ठल-रुख्मिनी प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर यात विद्यार्थ्यांनी विट्ठल, रुख्मिणी,संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, वासुदेव तसेच संत मंडळींची वेशभूषा साकारून कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
०००००००००००००००
शानभाग विद्यालयात पार पडला रिंगण सोहळा (फोटो)
ब.गो. शानभाग विद्यालयात सोमवारी दिंडी व रिंगण सोहळा आणि भक्तीगीत गायनाचा संगीतमय कार्यक्रम झाला. मुख्याध्यापिका अंजली महाजन, जयंतराव टेंभरे, शशिकांत पाटील, सुर्यकांत पाटील, जगदीश चौधरी आणि राजेंद्र पाटील यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर रिंगण करून विठूनामाचा गजर केला. तसेच मान्यवरांचे शुभहस्ते पालखी पालखी पूजन करून दिंडी संगीतमय कार्यक्रमाच्या सभामंडपात आली. गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. सुरज बारी (माझे माहेर पंढरी), कविता कुरकुरे (विठ्ठलाच्या पायी वीट), संतोष जोशी (चंद्रभागेच्या तिरी) आणि किरण सोहळे यांनी भारुड गायले. प्रास्ताविक, आभार प्रवीण पाटील यांनी तर सूत्रसंचालन रुपाली पाटील आणि अनुराधा देशमुख यांनी केले.
०००००००००००००
आषाढीनिमित्त रंगली अभंग गायन स्पर्धा (फोटो)
विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अभंग व गीत गायन स्पर्धा घेण्यात आली़ यावेळी मुख्याध्यापक डी. वाय. पाटील आणि समन्वयिका सविता कुलकर्णी, प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील आणि समन्वयिका रत्नमाला पाटील यांनी पालखी पूजन केले. यावेळी भूषण खैरनार आणि संतोष चौधरी यांनी विठू नामाचा गजर केला.
०००००००००००००००००००००
विठूरायाला घातले साकडे (फोटो)
जनार्दन खडके प्राथमिक विद्यामंदिरात कोरोनाचे संकट जावू दे अशी प्रार्थना करून विठूरायाला साकडे घालण्यात आले. मुख्याध्यापिका आशालता वाणी यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन पूनम पाटील यांनी केले़
०००००००००००००००
आॅनलाइन भजने व गाणी सादर
सरस्वती प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल येथे ऑनलाइन पध्दतीने विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा साकारून विठूरायाची भजने व गाणी सादर केली. यावेळी मुख्याध्यापक मुरलीधर चौधरी, स्वाती भंगाळे, वृषाली विसपुते आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
०००००००००००००००
विद्यार्थ्यांनी धरला ठेका
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्यावतीन आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध भक्तीगीते व संतांची, वारक-यांची वेशभूषा साकारून ठेका धरला होता़ यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक योगेश चौधरी यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले.
०००००००००००००
आऱआऱ विद्यालयात हरिनामाचा गजर
आर.आर. विद्यालयात हरिनामाचा गजर कार्यक्रम पार पडला. यावेळी विठूरायाच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ शिक्षक डी.बी.पांढरे यांच्याहस्ते करण्यात आले़ तर पौराहित्य संस्कृत विभाग प्रमुख द्वारकाधीश जोशी यांनी केले. याप्रसंगी संगीत शिक्षक संजय क्षीरसारग यांनी संत नामदेवांचे अभंग सादर केले.
००००००००००००००
वेशभूषा साकारत काढली मिरवणूक
शिशु विकास मंदिर येथे विद्यार्थ्यांना ऑनलाइन दिंडी दाखविण्यात आली. पालखीचे पूजन मुख्याध्यापिका वृषाली दलाल यांनी केले. लवकरचं कोरोनाचे संकट दूर करून शाळा सुरू होवू दे अशी प्रार्थना करण्यात आली.