शाळा सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:14 AM2020-12-08T04:14:07+5:302020-12-08T04:14:07+5:30
नववी ते बारावीचे वर्ग सुरू होण्याआधी शिक्षकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. १७ नोव्हेंबरपासून या तपासणी मोहीमेला ...
नववी ते बारावीचे वर्ग सुरू होण्याआधी शिक्षकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. १७ नोव्हेंबरपासून या तपासणी मोहीमेला सुरूवात झाली होती. आतापर्यंत जिल्ह्यातील ३४ शिक्षक तर १५ शिक्षकेतर कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी दिली.
७२ हजार ५२७ पालकांचा ‘हो’
मंगळवारपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवार अखेरपर्यंत ७२ हजार ५२७ पालकांनी संमती पत्रे दिली आहेत़ मुलांना शाळेत पाठविण्यास तयार असल्याचे संमतीपत्रात त्यांनी म्हटले आहे. तसेच बहुतांश विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत हजर झाल्यानंतर संमतीपत्र जमा करणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना जेवणाचा डबा आणण्यास मनाई केली आहे तर पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र वॉटरबॅग आणण्याच्या सूचना केल्या आहेत. विद्यार्थी एकत्र येणार नाही म्हणून मधली सुटी देखील होणार नाही़. मैदानी खेळ देखील घेतली जाणार नाही.
शाळांची करणार पाहणी
क्षेत्रिय अधिका-यांचे पथक ज्या शाळा सुरू होणार आहेत, त्या शाळांना भेटी देवून पाहणी करणार आहेत. या क्षेत्रिय अधिका-यांमध्ये १५ गटशिक्षणाधिकारी, ४३ शिक्षण विस्तार अधिकारी, १६० केंद्रप्रमुख यांचा समावेश आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी देखील शाळांना भेटी देवून पाहणी करतील.
आश्रमशाळाही सुरू होणार
जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया अंतर्गत असलेल्या आदिवासी आश्रम शाळेच्या इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुध्दा मंगळवारपासून प्रारंभ होत आहेत. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व्यवस्था करण्यात येत असल्याचे प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
सोमवारी प्रकल्प अधिकारी सोनवणे यांनी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची ऑनलाईन बैठक घेवून शासनाने दिलेल्या मार्गदशक सुचना तंतोतंत पाळण्योच आदेश दिले आहेत़ पालकाचे संमतीपत्र तसेच सुरक्षीत अंतर आणि स्वच्छता सर्व बाबींचे पालन करण्याच्या सुचना दिल्या आहेत.