जळगावात मनपाच्या शाळा व रुग्णालयांना मिळणार ‘आयएसओ’ मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 01:11 PM2018-09-27T13:11:00+5:302018-09-27T13:11:38+5:30

आयुक्तांची माहिती

Schools and hospitals of Jalgaon municipal schools get 'ISO' rating | जळगावात मनपाच्या शाळा व रुग्णालयांना मिळणार ‘आयएसओ’ मानांकन

जळगावात मनपाच्या शाळा व रुग्णालयांना मिळणार ‘आयएसओ’ मानांकन

Next
ठळक मुद्देदर्जा सुधारण्यावर भरसमितीकडून होणार पाहणी

जळगाव : महानगरपालिकेच्या शाळा व रुग्णालयांना आयएसओ मानांकन मिळण्यासाठी मनपा प्रशासनाकडून प्रयत्न केले जाणार आहे. यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या एजन्सीचे प्रतिनिधी आणि मनपा अधिकारी गुरुवारी मनपाच्या शाळा व रुग्णालयांची तपासणी करणार असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे.
महापालिकेच्या शाळांची स्थिती अतिशय खराब झाली. त्यामुळे मनपा प्रशासनाकडून ही स्थिती सुधरावी यासाठी खास प्रयत्न के ले जाणार आहेत. त्यानुसार गुरुवारी २५ शाळांपैकी कोणत्याही १० शाळांची पाहणी करण्यात येणार आहे. या पाहणीबाबत मनपाच्या सर्व शाळांना सूचना देण्यात आली आहे. तसेच मनपा रुग्णालयांना देखील याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. शाळांची पाहणी केल्यानंतर पहिल्या टप्प्यात कोणत्याही पाच शाळांची निवड केली जाणार आहे.
शिक्षणाचा दर्जा तपासणार
शाळेतील मुलांना चांगले शिक्षण आणि रुग्णालयांमध्ये रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा रुग्णांना मिळण्यासाठी मनपा प्रशासन प्रयत्न करीत आहे. आयएसओ मानांकन याचाच एक भाग आहे. या मानांकनाचे काम पाहणाऱ्या एजन्सीचे प्रतिनिधी व मनपा अधिकारी गुरुवारी शाळा व रुग्णालयांची संयुक्त पाहणी करतील. यावेळी शाळांमधील अध्यापन पध्दती, शिक्षणाचा दर्जा, मुलांची अभ्यासातील प्रगती, स्वच्छता व अन्य बाबींची पाहणी केली जाईल. काही त्रुटी आढळून आल्यास त्या दूर करण्यास एजन्सीचे प्रतिनिधी सांगतील. याची ते पुढील भेटीत पुन्हा पाहणी केली करतील. यानंतर मानांकनाची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
मनपा करणार स्पोर्टस अकॅडमी
खेळाबद्दल आवड असणाºया युवकांना शहरात आवश्यक सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी मनपाकडून स्पोर्ट्स अकॅडमी तयार केली जाणार आहे. यासाठी शहरातील काही शासकीय जागांचा शोध घेतला जात असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. जागेचा शोध घेतल्यानंतर महासभेसमोर प्रस्ताव ठेवला जाणार असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली आहे.

Web Title: Schools and hospitals of Jalgaon municipal schools get 'ISO' rating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.