जळगाव जिल्ह्यात मंगळवारी शाळा उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:10 AM2020-12-07T04:10:51+5:302020-12-07T04:10:51+5:30
जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी शाळा उघडणार असून शाळा उघडण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाकडून नियमावली तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक ...
जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी शाळा उघडणार असून शाळा उघडण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाकडून नियमावली तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारी दुपारी रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास गुलाबराव पाटील यांनी अभिवादन केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
८ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याची तयारी जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागाकडून सुरू आहे. ही तयारी सुरू असताना रविवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंगळवारपासून शाळा सुरू करणार असल्याचे सांगितले. यासाठी स्थानिक प्रशासनाकडून नियमावली तयार करण्यात येणार आहे. आगामी काळात कोरोनाची रुग्ण संख्या वाढणार नाही, या अनुषंगाने ही नियमावली राहणार असल्याचेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने नियमांच्या अधीन राहूनच शाळा सुरू होणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.