चाळीसगाव महाविद्यालयात विज्ञान प्रश्नमंजूषा स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:12 AM2021-07-05T04:12:46+5:302021-07-05T04:12:46+5:30

यंदा स्पर्धेचे २८ वे वर्ष आहे. ७ जुलै रोजी ही स्पर्धा पार पडणार आहे. सीताबाई मांगीलाल अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट ...

Science quiz competition at Chalisgaon College | चाळीसगाव महाविद्यालयात विज्ञान प्रश्नमंजूषा स्पर्धा

चाळीसगाव महाविद्यालयात विज्ञान प्रश्नमंजूषा स्पर्धा

Next

यंदा स्पर्धेचे २८ वे वर्ष आहे. ७ जुलै रोजी ही स्पर्धा पार पडणार आहे. सीताबाई मांगीलाल अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट देणगीतून कै. मांगीलाल गोवर्धनदास अग्रवाल स्मृतीप्रीत्यर्थ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन विज्ञान प्रश्नमंजूषा स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने होत आहे. स्पर्धेचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेत प्रथम पारितोषिक ३ हजार रुपये, द्वितीय २ हजार रुपये, तृतीय १ हजार रुपये, विशेष उत्तेजनार्थ (२ पारितोषिके) अशी आहेत.

कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे प्रथमच हो स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने होत आहे. स्पर्धेत वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील संघ सहभागी होऊ शकतात. पारितोषिक वितरण समारंभ ७ जुलै रोजी ऑनलाइन पद्धतीने होईल. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसाची रक्कम ऑनलाइन व प्रमाणपत्र पोस्टाने पाठवले जाईल. स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. मिलिंद वा. बिल्दीकर तसेच विज्ञान प्रश्नमंजूषा प्रमुख डॉ. विजय रा. बाविस्कर यांनी केले आहे.

Web Title: Science quiz competition at Chalisgaon College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.