युवकांना सक्षम करण्याचा ‘एसडी- सीड’चा प्रयत्न - सुरेशदादा जैन यांची पत्रपरिषदेत माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:50 PM2018-11-16T12:50:33+5:302018-11-16T12:52:17+5:30

रविवारी शिष्यवृत्ती वितरण सोहळा

'SD-SEED' to enable the youth - Information about Sureshdada Jain's press conference | युवकांना सक्षम करण्याचा ‘एसडी- सीड’चा प्रयत्न - सुरेशदादा जैन यांची पत्रपरिषदेत माहिती

युवकांना सक्षम करण्याचा ‘एसडी- सीड’चा प्रयत्न - सुरेशदादा जैन यांची पत्रपरिषदेत माहिती

Next
ठळक मुद्दे१३ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभयंदा १७५ विद्यार्थ्यांना दत्तक योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न

जळगाव : एसडी-सीड अर्थात सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजनेंतर्गत युवकांना सक्षम बनविण्याचा प्रयत्न असून यंदा गरजू आणि गुणवंत सुमारे ६०० विद्यार्थ्यांना रविवार, १८ रोजी शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती गुरुवारी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी पत्रपरिषदेत दिली.
७, शिवाजीनगर या त्यांच्या निवासस्थानी पत्रपरिषद झाली. यावेळी संस्थेचे गव्हर्निंग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, मार्गदर्शक छबीलभाई शहा, राजेश यावलकर उपस्थित होते. यावेळी सुरेशदादा जैन यांनी या उपक्रमाची तसेच कार्यक्रमाची माहिती दिली.
१३ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ
जिल्ह्यातील गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण निर्विघ्नपणे पूर्ण करावे, स्वत:ला सक्षम बनवावे या उद्देशाने ही शिष्यवृत्ती योजना जून २००८ मध्ये सुरु करण्यात आली. योजनेबाबत सुरेशदादा म्हणाले, आतापर्यंत १३००० हून अधिक विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे. एकूण ३१०० हून अधिक विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. त्याशिवाय ३० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना विविध विषयांवर तसेच २००० हून अधिक युवतींना भावनिक, मानसिक सबलीकरणासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. विद्यार्थी हितासाठी १२९ संस्थांसोबत सहकार्य करार केले असून अनेक विद्यार्थी त्या सुविधांचा लाभ घेत आहे. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन आणि जॉब फेअर,कॅम्पस इंटव्ह्यू आणि उद्योजकता विकास शिबिरांचे नियमित आयोजन करून नवनवीन रोजागाराच्या व उद्योगाच्या संधींची उपलब्धता करून दिली जात आहे. गुणवत्ता आणि गरजेनुसार ५ ते ५० हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते.
यंदा १७५ विद्यार्थ्यांना दत्तक योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न
मागील वर्षी सुरेशदादा जैन यांनी विद्यार्थी दत्तक योजना जाहीर केली होती. या योजनेस समाजातून विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून प्रतिसाद मिळाला असून ३७ विद्यार्थ्यांना दत्तक घेवून सक्रीय सहभाग नोंदवला गेला आहे. यंदा सुरेशदादा जैन यांचे अमृत महोत्सवी वर्ष असून या शैक्षणिक वर्षात लोकसहभागातून १७५ विद्यार्थ्यांना दत्तक योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. रेदासनी यांनी यावेळी सांगितले.
अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना पोषक वातावरण मिळावे यासाठी संस्थेतर्फे प्रतापनगरातील रत्ना जैन विद्यालयात ५० आसनांची अभ्यासिकाही सुरु करण्यात आली आहे. माफक दरात अभ्यासिकेत प्रवेश देण्यात येत आहे. सकाळी ८ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते रात्री ९ अशा दोन सत्रात वेळ ठेवण्यात आली आहे. यानुसार विविध भागात अभ्यासिका सुरु करावयाच्या असून यासाठी सेवाभावी व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहनही सुरेशदादा जैन यांनी केले आहे.
हणमंतराव गायकवाड व विजय दर्डा यांची मुख्य उपस्थिती
शिष्यवृत्ती वितरणाचा हा सोहळा रविवारी सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी भारत विकास ग्रुपचे (बी.व्ही.जी.)संस्थापक अध्यक्ष हणमंतराव गायकवाड (पुणे) आणि ‘लोकमत’ वृत्तपत्र समुहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांची मुख्य उपस्थिती असेल. ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करणार आहेत.

Web Title: 'SD-SEED' to enable the youth - Information about Sureshdada Jain's press conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.