मनपाकडून चार दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:13 AM2021-05-28T04:13:48+5:302021-05-28T04:13:48+5:30
जळगाव - महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून गुरुवारी फुले मार्केट परिसरातील चार दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. चारही कपड्यांची ...
जळगाव - महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून गुरुवारी फुले मार्केट परिसरातील चार दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. चारही कपड्यांची दुकाने असून, सकाळी 11 वाजता नंतर देखील हे दुकाने उघडी असल्याचे मनपाचा पथकाच्या निदर्शनास आले. चारही दुकाने सील करून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
आगामी पाच दिवस पावसाचा इशारा
जळगाव- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्र सहित छत्तीसगड व झारखंड या राज्यांमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे जिल्ह्यात आगामी चार दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसाच्या आगमनाचा दृष्टीने शेतकऱ्यांनी देखील हंगामपूर्व कापूस लागवडीला जोर धरला आहे.
गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा
जळगाव - तालुक्यातील आव्हाने, खेडी, निमखे डी व बांभोरी येथील गिरणा नदीपात्रात रात्रीच्या वेळेस अवैधपणे वाळू उपसा सुरू असून, दररोज 100 हून अधिक डंपर व ट्रॅक्टरद्वारे बेसुमार उपसा केला जात आहे. विशेष म्हणजे दररोज महसूलचा पथकाकडून पाहणी केली जात असतानाही हा उपसा सुरू असल्याने महसूल प्रशासनाचा कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.