भुसावळात तीन दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 05:50 PM2020-06-06T17:50:03+5:302020-06-06T17:51:54+5:30
वेळेचे उल्लंघन करणाऱ्या तीन दुकान दुकांनावर सील करण्याची संयुक्त कारवाई पालिका व पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आली.
भुसावळ, जि.जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी खुद्द आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भुसावळकरांची दखल घेतली कडक प्रशासन लागू करण्याच्या सूचना केल्या. शहरात गर्दी कमी करण्यासाठी ठरावीक दिवशी व वेळी दुकाने उघडण्याच्या नियमावली तयार करण्यात आली आहे. वेळेचे उल्लंघन करणाऱ्या तीन दुकान दुकांनावर सील करण्याची संयुक्त कारवाई पालिका व पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आली.
बाजारात गर्दी होऊ नये एकाच वेळेस सर्व दुकाने न उघडता वार व वेळेच्या बंधनासह शहरवासीयांसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. ५ जून रोजी शणिमंदिर वॉर्डातील जय सीयाराम कॉम्प्लेक्समधील जयराम बच्चाराम मनमानी यांचे जयवैष्णव माता प्रोव्हिजन हे दुकान वेळेचे नियमभंग केल्यामुळे ५ रोजी सील करण्यात आले. ६ रोजी बाजारातील जयहिंद बेकरी ही बेकरी उघडण्याचा दिवस नसतानाही चुकीच्या दिवशी सुरू करण्यात आले. यामुळे सील करण्यात आले. तसेच खडका रोड येथील शेख नईम शेख इब्राहिम यांची न्यू इंजिनियरिंग वर्क्स हे दुकानसुद्धा वारचे उल्लंघन केल्यामुळे सील करण्यात आले. पुढील आदेश येईपर्यंत हे दुकाने सील राहणार आहे.
शहरात वार व वेळेचे उल्लंघन कारवाई करण्यासाठी पाच पथक पालिका प्रशासनातर्फे नेमण्यात आले आहेत. ही कारवाई प्रभारी मुख्याधिकारी किरण सावंत पाटील तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सहकारी तसेच पालिकेचे प्रशासकीय अधिकारी म्हणून चेतन पाटील, रामदास मस्के यांच्यासह पथकामध्ये नगर अभियंता पंकज पन्हाळे, पाणीपुरवठा अभियंता राजीव वाघ, अनिल मंदवाडे, सूरज नारखेडे, संजय बानाईत, लक्ष्मीनारायण नाटकर, राजेश पाटील, संतोष पल्लीवाल, गोपाळ पाटील, अनिल पाटील यांचा समावेश आहे.
याशिवाय शहरातील यावल रोड, तापी नगर, दगडी पुलाचा परिसर या ठिकाणी सर्व दुकानदारांना वैयक्तिक भेटी घेऊन सूचना वजा समज देण्यात आलेली आहे. दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्यास कारवाई सक्तीने करण्यात येणार आहे, असे पालिका प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई करण्याचे सत्र सुरू होते.