दारुच्या ६०० गोदामांना लावले सील
By admin | Published: April 2, 2017 12:41 AM2017-04-02T00:41:31+5:302017-04-02T00:41:31+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी : शहरातील ४० दुकाने पुन्हा सुरूहोणार; महामार्गावर शुकशुकाट
जळगाव : सर्वोच्च न्यायालयाने महामार्ग व राज्यमार्गावरील दारुची दुकाने, परमीट रुम व बियर बार १ एप्रिलपासून बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी जिल्ह्यातील ६०० दुकाने व बारमधील साठ्याचे मोजमाप करुन त्याचे गोदाम सील केले. या व्यावसायिकांना बंदची नोटीस देऊन दुकानांचा पंचनामा करण्यात आला.
मद्याच्या नशेत वाहने चालविल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढून त्यात बळी जाणाºयांची संख्या अधिक असल्याचे मत नोंदवून सर्वोच्च न्यायालयाने राज्य व राष्टÑीय महामार्गाला लागून असलेल्या ५०० मीटरच्या आत असलेले दारू दुकाने, परमीट रुम व बार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ३१ मार्च रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी १ एप्रिल रोजी दुकाने न उघडण्याच्या सूचना व्यावसायिकांना दिल्या होत्या.
शहरातील ४० दुकानांना दिलासा
जळगाव महानगरपालिकेकडे देखभाल व दुरुस्तीसाठी वर्ग केलेल्या सहा रस्त्यांना शासनाने अवर्गीकृत करण्यास मान्यता दिल्याने त्यामुळे मनपा हद्दीत राज्यमार्गाला लागून असलेल्या ४० हॉटेल व दुकानांना दिलासा मिळाला आहे. नव्या आदेशानुसार २०.५२० किलोमीटरचे हे रस्ते येतात. या रस्त्यावरील दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश द्यावेत यासाठी
वाईन शॉपवर झुंबड
न्यायालयाच्या आदेशाने ५०० मीटरच्या आत असलेले दारुचे दुकाने व हॉटेल बंद झाल्याने शनिवारी संध्याकाळी गणेश कॉलनी, नवी पेठ व पोलन पेठ या भागात वाईन शॉपवर दारु खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली होती. गणेश कॉलनीत तर रांगा लागल्या होत्या व रेटारेटी झाली होती. तर संध्याकाळी शहरातील बारवरही ग्राहकांची गर्दी झाली होती.
म्हणून बंद राहिल्या शहरातील हॉटेल्स
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ५०० मीटरच्या आत असलेल्या हॉटेल्स व बार बंद होते तर राज्य शासनाने शुक्रवारी राज्यपालांच्या आदेशाने काढलेल्या अधिसूचनेमुळे स्टेशन रोड व जुन्या राज्यमार्गाला लागून असलेल्या अनेक हॉटेल्स व बार बंद होते. जिल्हा प्रशासनाने या हॉटेल्सचे नूतनीकरण केलेले नाही, त्यामुळे शनिवारी या हॉटेल बंद होत्या अशी माहिती एका हॉटेल व्यावसायिकाने दिली.