थकबाकीपोटी गाळ्यांना ठोकले सील
By admin | Published: March 16, 2017 12:11 AM2017-03-16T00:11:47+5:302017-03-16T00:11:47+5:30
वसुली मोहीम सुरू : पालिकेची धडक कारवाई, व्यावसायिकांमध्ये कारवाईने खळबळ
भुसावळ : थकबाकी वसुलीसाठी पालिकेची धडक वसुली मोहीम सुरू झाली आहे. थकबाकीपोटी पालिकेच्या मालकीची दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
जामनेर रोडवरील श्री छत्रपती शिवाजी महाराज दुकान संकुलातील देवाज युवराज सपकाळे यांचा गाळा नं. 21 आहे. त्यांच्याकडे 48 हजार 96 रुपये थकबाकी आहे. बांगडी मार्केटमधील लक्ष्य स्वयंरोजगार सेवा योजनेचा गाळा नं. 8 यांच्याकडे 46 हजार 992 रुपये थकबाकी आहे. याच संकुलातील गाळा नं.7 चे राजेश नंदलाल चोपडा यांच्याकडे 16 हजार 142 रुपये थकबाकी आहे. याच मार्केटमधील ताहेर यासीन पटेल यांच्या गाळा नं. 24 कडे 32 हजार 493 रुपये थकबाकी आहे. त्यामुळे हे सर्व गाळे पालिकेने बुधवारी सील केल्याची माहिती नगरपालिका सूत्रांनी दिली.
यांनी केली कारवाई
दरम्यान, पालिकेच्या या मोहिमेमुळे थकबाकीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांच्या सूचनेनुसार वसुली पथकप्रमुख सुभाष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गोपाळ पाली, राजू चौधरी, मोहन भारंबे, राजेंद्र टाक, डी.सी. इंगळे, जयकुमार पिंजारी यांच्या पथकाने थकबाकीपोटी गाळे सील करण्याची कारवाई केली आहे.
(प्रतिनिधी)
शहरातील विकासकामांसाठी नागरिकांनी त्यांच्याकडील विविध करांची थकबाकी वेळेत भरून पालिका प्रशासनाला सहकार्य करावे.
- बी.टी.बाविस्कर, मुख्याधिकारी, भुसावळ नगरपालिका.
अतिक्रमणधारकांची बाजू पालिका समजून घेणार
साकेगाव शिवारातील पालिकेच्या अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी असलेल्या घरकुलांमध्ये अतिक्रमण केलेल्या रहिवाशांची बाजू व त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी पालिकेतर्फे 17 रोजी दुपारी 4 वाजता पालिका सभागृहात बैठक बोलावली आहे. यात नगराध्यक्ष रमण इंगळे, सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर हजर राहतील.
225 घरकुले
4साकेगाव पालिकेच्या सव्र्हे क्रमांक 297 वर 225 सदनिका असलेले घरकूल उभारण्यात आले आहेत. त्यातील सर्वच घरांमध्ये अतिक्रमण झाले आहे.