करार संपलेले दोन गाळे सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:20 PM2019-01-25T12:20:46+5:302019-01-25T12:21:27+5:30
पोलीस बंदोबस्तात दुकाने घेतली ताब्यात
जळगाव : जिल्हा परिषदेच्या मालकीच्या कराराची मुदत संपलेल्या शहरातील दोन गाळ्यांना सील करण्याची कार्यवाही गुरुवारी दुपारी करण्यात आली. यावेळी दोन्ही गाळेधारकांंनी विरोध केल्याने पोलीस बंदोबस्तात ही कार्यवाही पूर्ण करण्यात आली.
अल्पबचत भवनमधील पशुसंवर्धन विभागाच्या सर्वे नं १८५१ मध्ये जिल्हापरिषदेच्या मालकीच्या २० दुकानांच्या कराराची मुदत २००३ मध्ये संपली आहे. या दुकानांवर कारवाई प्रक्रिया सुरु असतानाच त्यापैकी १८ व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे ही कार्यवाही थांबली. मात्र अन्य दोन गाळ्यांवरही कार्यवाही का होत नाही ? असा प्रश्न काही जि. प. सदस्यांनी उपस्थित केल्याने जि.प. च्या बांधकाम विभागाने ही कार्यवाही करून ते ताब्यात घेतले आहे.
या एकूण २० गाळ्यांपैकी मंगलाबाई सपकाळे व पंढरीनाथ सपकाळे यांच्या ताब्यात असलेली दोन्ही दुकाने जि.पने पंचनामा करून पोलिस बंदोबस्तात ताब्यात घेतली आहे.
यावेळी गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, उपगट विकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, उप अभियंता सतिष शिसोदे, सचिन बडगे, विस्तार अधिकारी एन.डी.ढाके, अतुल बागुल यांनी ही कारवाई केली.
५ वर्षांसाठी दिले होते कराराराने
सदर २० गाळे हे गाळे १९९४ मध्ये ५ वर्षांसाठी व्यापाऱ्यांना कराराने दिले होते. १५ बाय १० आकाराची ही दुकाने असुन ८०० ते १००० रुपए दरमहा एका दुकानाचे भाडे होते. मात्र गेल्या १४ वर्षांपासून गाळेधारकांकडून सुमारे ५० लाख ३८ हजाराची थकबाकी भरली नसल्याने जि.पने अंतिम नोटीस बजावली व तात्काळ बाकी भरण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी १८ व्यवसायीकांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने ही १८ दुकांने खाली करण्यासंदर्भात मनाई हुकुम दिला आहे. त्यामुळे या दुकानदारांवर कारवाई करता आली नाही. मात्र गाळे क्र १३ व १५ या दुकानांचा जिपने आता घेतला आहे.