ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान यंत्रे सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:41 AM2021-01-13T04:41:05+5:302021-01-13T04:41:05+5:30

जळगाव - जिल्ह्यात येत्या १५ जानेवारीस ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात एकूण दोन हजार ७७४ मतदान यंत्रे ...

Sealing machines for Gram Panchayat elections | ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान यंत्रे सील

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान यंत्रे सील

Next

जळगाव - जिल्ह्यात येत्या १५ जानेवारीस ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात एकूण दोन हजार ७७४ मतदान यंत्रे लागणार आहेत. ही यंत्रे तहसील कार्यालयांकडे सुपूर्द केली आहेत. मंगळवारी नूतन मराठा महाविद्यालयात ग्रामपंचायतनिहाय उमेदवारांच्या याद्या लावून यंत्रे सील करण्यात आली. त्यानंतर सर्व यंत्रे स्टोअर रूमला रवाना करण्यात आली. मतदानाच्या एक दिवस आधी मतदान यंत्रे केंद्रांवर पोहचवली जाणार आहेत.

१३ हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात दोन हजार ४१२ मतदान केंद्रे आहेत. त्यावर १३ हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यातील २० हजार २६४ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यात २८८ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते, तर १९ हजार ९७६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. माघारीच्या दिवशी सहा हजार १२९ उमेदवारांनी माघार घेतली होती. जिल्ह्यात ९३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. सध्या सात हजार २१३ जागांसाठी १३ हजार २४७ उमेदवार रिंगणात आहेत.

सिलिंग व सेंटींगचे प्रात्यक्षिक

सकाळी ८ वाजेपासून तहसीलदार नामदेव पाटील, नायब तहसीलदार दिलीप बारी यांच्या उपस्थितीत मंगळवारी मतदान यंत्रांमध्ये ग्रामपंचायतनिहाय उमेदवारांच्या याद्या लावण्यात आल्या. गाव व मतदान केंद्रनिहाय मतदान यंत्रे तयार करण्यात आली. ३० टेबलवर मास्टर ट्रेनरच्या सहाय्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी इव्हीएम मशिन सील केले. त्यासाठी सिलींग व सेटींगचे प्रात्यक्षिक सुध्दा दाखविण्यात आले. जळगाव तालुक्यात १७० केंद्रांवर मतदान होणार आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सील केलेले ईव्हीएम मशिन हे स्टोअर रूमला रवाना करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Sealing machines for Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.