टंचाईच्या झळा : जळगाव जिल्ह्यातील पशूधनासाठी चारा राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:16 PM2018-10-21T12:16:10+5:302018-10-21T12:16:32+5:30
जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक केल्यास गुन्हे दाखल होणार
जळगाव : जिल्ह्यात भविष्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्याबाहेर अथवा बाहेरील राज्यात चारा वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. या संदर्भात जिल्हाधिकाºयांनी २० रोजी आदेश जारी केले असून याचे उल्लंघन करणाºया विरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही जिल्हाधिकाºयांनी दिला आहे.
जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यात भविष्यात चारा टंचाई निर्माण होण्याती शक्यता आहे. त्यामुळे ही स्थिती लक्षात घेता पशुधनासाठी चारा आवश्यक आहे. त्यादृष्टीने २० आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकाºयांनी चारा वाहतूक बंदीबाबत आदेश काढले. पुढील ६० दिवस हे आदेश लागू राहणार असल्याचेही आदेशात नमूद केले आहे.