वडिलांना शोधत मुलगा पाळधीत पोहचला अन् त्यांच्या आत्महत्येचा निरोप आला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:13 AM2021-07-01T04:13:09+5:302021-07-01T04:13:09+5:30
दरम्यान, यादव यांना दम्याचा आजार होता. चहार्डी, ता.चोपडा येथे दर्ग्यावर बाबांकडे जाऊन येतो असे सांगून ते सोमवारी सकाळीच घरातून ...
दरम्यान, यादव यांना दम्याचा आजार होता. चहार्डी, ता.चोपडा येथे दर्ग्यावर बाबांकडे जाऊन येतो असे सांगून ते सोमवारी सकाळीच घरातून बाहेर पडले. बुधवारी सकाळी सेवानिवृत्त पोलीस हवालदार लालसिंग उदयसिंग पाटील यांच्या पिंप्राळा शिवारातील गट क्र.३२० मधील शेतातील विहिरीत यादव यांचा मृतदेह पाटील यांनाच तरंगताना दिसून आला. त्यांनी लागलीच रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. हवालदार अनमोल पटेल यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह मुलाच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वडिलांना शोधत मुलगा पोहोचला पाळधीत
चहार्डी येथे गेलेले वडील संध्याकाळपर्यंत घरी परतणे अपेक्षित होते, मात्र ते आले नाहीत. कुठे तरी मुक्कामाला थांबले असावे म्हणून मुलाने त्या दिवशी चौकशी केली नाही. दुसऱ्या दिवशीही वडील घरी न आल्याने त्यांनी चहार्डीत चौकशी केली असता ते सोमवारीच परत गेल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मुलगा संजय यादव याने मंगळवारपासून वडिलांचा शोध घेतला. बुधवारी तो त्यांना शोधण्यासाठी पाळधीपर्यंत पोहचला अन् लगेच वडिलांचा मृतदेह विहिरीत आढळल्याचा निरोप आला. आजारपणामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचे मुलगा संजय याने ‘लोकमत’ला सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी सुमनबाई, अविवाहित मुलगा संजय व विवाहित मुलगी अरुणा संजय पाटील असा परिवार आहे. यादव कुटुंब मजुरी करून उदरनिर्वाह भागवतात.