सेना- भाजपच्या संघर्षात मतदारसंघ भरडला जातोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:16 AM2018-12-03T00:16:41+5:302018-12-03T00:20:07+5:30

शिवसेना- भाजपाच्या संघर्षात पाचोरा मतदारसंघ भरडला जात असल्याचा आरोप माजी आमदार दिलीप वाघ यांनी रविवारी पाचोरा येथे आयोजीत राष्टÑवादी काँग्रेसच्या मेळाव्यात केला.

 Seats- BJP is fraying the constituency! | सेना- भाजपच्या संघर्षात मतदारसंघ भरडला जातोय!

सेना- भाजपच्या संघर्षात मतदारसंघ भरडला जातोय!

Next
ठळक मुद्देशेतकरी आणि दुष्काळाच्या प्रश्नावर सेना- भाजपाचे मात्र मौनमेळाव्याला जिल्हाभरातून उपस्थिती

पाचोरा : पाचोरा- भडगाव मतदार संघात सेना भाजप सांस्कृतिक कार्यक्रमात रमले असून एकमेकांवर मात करण्याच्या त्यांच्या संघर्षात मतदारसंघ मात्र भरडला जातोय अशी टीका माजी आमदार दिलीप वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात केली.
सेना भाजपाने मतदार संघात दुष्काळ आणि शेतकरी प्रश्नांवर मौन बाळगले असून त्यांच्यातच संघर्ष जनता पाहत असल्याचे मत त्यांनी मांडले. जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी प्रत्येक गावात छोटेखानी सभा घेऊन स्थानिक पातळीवर शेतकरी आणि पाणी प्रश्न शासनापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्फत पोहचवावेत असे आवाहन केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या लोकाभिमुख व समाजोपयोगी कार्यक्रमांच्या संदर्भात तसेच माजी उपमुख्यमंत्री व विधिमंडळ गटनेते अजित पवार यांच्या ९ डिसेंबर २०१८ रोजीच्या जळगाव जिल्हा दौºयानिमित्त पाचोरा भडगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा प्रसाद हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी युवा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ललित बागुल, महिला अध्यक्ष कल्पना पाटील, कार्याध्यक्ष विलास पाटील, जिल्हा प्रवक्ते खलील देशमुख, महानंदा दूध उत्पादक सहकारी संस्था संचालक प्रमोद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गटनेते संजय वाघ, सतीश चौधरी, वासुदेव महाजन विकास पाटील, अरुण मानकरी यांचेसह तालुक्यातील सर्वच फ्रंटचे तालुकाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी जि.प.,पं.स.सदस्य,नगरसेवक,विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नितीन तावडे यांनी सूत्रसंचालन केले. आभार अजहर खान यांनी मानले.

 

Web Title:  Seats- BJP is fraying the constituency!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.