दुस-या दिवशी ७१ उमेदवारांनी दाखल केले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 08:54 PM2020-12-24T20:54:47+5:302020-12-24T20:54:59+5:30

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी 

On the second day, 71 candidates filed applications | दुस-या दिवशी ७१ उमेदवारांनी दाखल केले अर्ज

दुस-या दिवशी ७१ उमेदवारांनी दाखल केले अर्ज

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ग्रामपंचायत निवडणूकीसाठी जळगाव जिल्ह्यात गुरूवारी दुस-या दिवशी ७१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तहसील कार्यालयांच्या आवारात निवडणूकीसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. तसेच जात वैधता प्रमाणपत्राच्या पावतीसाठी देखिल इच्छुक उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची दिवसभरात चांगलीच धावपळ उडाली.

जिल्ह्यात ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याला सुरूवात झाली आहे. जळगाव तालुक्यासह जिल्हाभरातून गुरूवारी ७१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. सकाळी साडे नऊपासूनच इच्छूकांनी तहसिल कार्यालयात ग्रामपंचायत निहाय टेबलावर जावून अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. जळगाव तालुक्यातून तीन अर्ज दाखल झाले आहे. त्यामध्ये ममुराबाद, आवार तसेच चिंचोली गावातून प्रत्येक एक अर्ज गुरूवारी दाखल झाला आहे.

तालुकानिहाय दाखल अर्जांची संख्या

जळगाव तालुका ३, जामनेर ५, धरणगाव २, एरंडोल २, पारोळा ३, भुसावळ ७, मुक्ताईनगर १, बोदवड १४, यावल ०, रावेर ८, अमळनेर ७, चोपडा ३, पाचोरा ६, भडगाव २ आणि चाळीसगाव ८ असे एकुण ७० उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.

जात पडताळणी समितीचे कार्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अथवा प्रस्ताव सादर केल्याची पोहोच पावती जोडणे बंधनकारक केलेले आहे. त्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांकडुन अर्ज दाखल होत आहे. उमेदवारांची गैरसोय होवू नये, याकरीता २५ ते २७ डिसेंबर या शासकीय सुटीच्या दिवशी सकाळी ९.४५ ते ६.१५ या कार्यालयीन वेळेत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथील कार्यालय उमेदवारांचे अर्ज स्वीकारणेसाठी नियमीत सुरु राहणार आहे.

 

Web Title: On the second day, 71 candidates filed applications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.