बजरंग बोगद्याचे दुसºयांदा भूमिपूजन

By admin | Published: March 6, 2017 01:18 AM2017-03-06T01:18:46+5:302017-03-06T01:18:46+5:30

श्रेयासाठी भाजपाची धडपड : खासदार म्हणतात आम्हीही प्रयत्न केले; आमदार म्हणतात ७५ टक्के निधी केंद्र शासनाचा

The second day of the Bajrang tunnel, Bhumi Pujan | बजरंग बोगद्याचे दुसºयांदा भूमिपूजन

बजरंग बोगद्याचे दुसºयांदा भूमिपूजन

Next

जळगाव : बजरंग बोगदा कामाच्या श्रेयासाठी भाजपाची धडपड सुरू असून १४ फेब्रुवारी रोजीच मनपा व रेल्वेच्या अधिकारी, पदाधिकाºयांच्या उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन झालेले असताना रविवार, ५ रोजी दुसºयांदा याच कामाचे भूमिपूजन भाजपातर्फे करण्यात आले. खासदार ए.टी. पाटील, आमदार सुरेश भोळे यांच्यासह भाजपाचे नगरसेवकही यावेळी उपस्थित होते.
आमदार सुरेश भोळे यांनी तर खासदारांनीच या कामासाठी केंद्राचा ७५ टक्के निधी आणल्याचे  भाषणात जाहीरही करून टाकले. मात्र कार्यक्रम संपल्यावर पत्रकारांनी खासदारांना याबाबत विचारणा करताच त्यांनी घुमजाव करीत मनपाने निधी खर्च केला. मात्र आम्हीही प्रयत्न केल्याचे सांगत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.
शहरातील लाखभर किंबहुना त्याहून अधिक नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या या बजरंग बोगद्याचे काम मार्गी लावल्याचे श्रेय मनपातील सत्ताधारी खान्देश विकास आघाडीने एकट्याने घेतल्याने अस्वस्थ झालेल्या खासदार ए.टी. पाटील, आमदार सुरेश भोळे यांनी दुसºयांदा या कामाच्या भूमिपूजनाचा घाट घातला.
१४ फेब्रुवारी रोजी भूमिपूजन झाले असताना रविवारी या बोगद्याजवळच मंडप उभारून भाजपातर्फे सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास भूमिपूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे मनपातील विरोधी पक्षनेते वामनराव खडके, गटनेते सुनील माळी, नगरसेवक डॉ.अश्विन सोनवणे, पृथ्वीराज सोनवणे, विजय गेही, रेल्वेचे कार्यकारी अभियंता (वरिष्ठस्तर) एस.के. सिन्हा, सिनीयर सेक्शन इंजिनियर शशीकांत पाटील उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमाला याच भागातील भाजपाच्या भाग्यश्री चौधरी, तसेच नागरिक उपस्थित होते. खासदार ए.टी. पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले.

खासदार ए.टी. पाटील यांनी मात्र आमदार भोळे यांची बाजू सावरून घेत या कामासाठी सर्वांनीच पाठपुरावा केल्याचे सांगितले. पावसाळ्यात सांडपाणी वाहून जाण्यासाठीच असलेल्या बजरंग बोगद्यात पाणी व चिखल साचून वाहनांना अपघात होत होते. त्यामुळे  नवीन बोगद्याच्या कामासाठी पाठपुरावा केला.  
पिंप्राळासाठी    निविदा प्रक्रिया
खासदार ए.टी. पाटील म्हणाले, पिंप्राळा रेल्वे उड्डाण पुलाचे काम नहीच्या निधीतून मंजुरी मिळाली आहे. आता लवकरच  या उड्डाणपुलासाठी निविदा प्रक्रिया सुरू होईल.

 पिंप्राळा व शिवाजीनगर उड्डाणपूल लवकरच

नागरिकांना मार्गदर्शन करताना आमदार सुरेश भोळे म्हणाले की, खासदार ए.टी. पाटील तसेच आमदार भोळे यांनी स्वत: या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यासाठी ७५ टक्के निधी केंद्राकडून खासदारांनी मिळविला. असे असताना १५ दिवसांपूर्वी मनपातील सत्ताधाºयांनी या कामाचे भूमिपूजन करून एकट्याने श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. वास्तविक या परिसरातील भाजपाच्या भाग्यश्री चौधरी व इतरांनी याचा पाठपुरावा केला. वेळोवेळी उपोषणही केले. निवेदने दिली. खासदार पाटील यांनी दिल्लीत पाठपुरावा केला. या सर्वांच्या प्रयत्नाने हे काम मंजूर झाले. आज या कामाला खरी सुरूवात झाली. शिवाजीनगर व पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचा विषयही लवकरच मार्गी लावण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.

दोन उड्डाणपुलांसाठी अडचण
शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल व दूध फेडरेशनजवळील रेल्वे उड्डाणपुलाचे कामही राष्टÑीय महामार्ग विभागाकडून करून घेण्याचा प्रयत्न आहे. मात्र त्यासाठी वाहतुकीच्या सर्व्हेनुसार किमान १ लाख वाहनांची ये-जा असणे आवश्यक असते. दूधफेडरेशनच्या पुलासाठी त्याची अडचण असल्याने ५० टक्के निधी देण्यास केंद्र शासन तयार नाही. तर १०० टक्के खर्च करण्यास राज्य शासन तयार नाही.शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलासाठी ६ कोटी ७५ लाख रुपये मनपा देईल, असा ठराव आधी केलेला असल्याने अडचण झाली आहे. रेल्वे मनपाकडून हा निधी मागते. तरच उर्वरीत निधी खर्च करण्याची तयारी असल्याचे सांगत आहे. मात्र केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून हे दोन्ही विषयही मार्गी लावले जातील, असे सांगितले.

मनपाचा निधी; पाठपुरावा आम्ही केला : ए.टी. पाटील
आमदार भोळे यांनी भाषणात ७५ टक्के निधी आणल्याचा केलेला दावा अंगाशी येणार असल्याचे लक्षात येताच खासदार पाटील यांनी घुमजाव केले. रेल्वेचे कार्यक्रम खासदारांच्या उपस्थितीत झाले पाहिजेत, अशा सूचनाच असल्याने रेल्वेच्या अधिकाºयांनीच या कार्यक्रमासाठी बोलविले. मनपाच्या सत्ताधाºयांनीही या विषयाचा पाठपुरावा केला. त्यामुळे त्यांनी भूमिपूजन केले. त्यात काही चूक नाही, मात्र आम्हीही पाठपुरावा केला, त्यामुळे आम्ही भूमिपूजन करणेही चूक नाही. राजकीय कुरघोडीचा हा प्रयत्न नसल्याचे सांगितले. मनपानेच निधी खर्च केला असल्याचे निदर्शनास आणून दिले असता ते म्हणाले की, त्यांनी निधी खर्च केला. त्यामुळे मनपाने भूमिपूजन केले. मात्र आम्हीही पाठपुरावा केला. एकत्रच सर्वांना बोलावून भूमिपूजन केले असते तर बरे झाले असते,असे ते म्हणाले.

Web Title: The second day of the Bajrang tunnel, Bhumi Pujan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.