नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३९३ कोटी २६ लाखाचा दुसरा हप्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 12:06 PM2019-12-18T12:06:03+5:302019-12-18T12:06:31+5:30

६४३ कोटींवरून ५७४ कोटींवर आला प्रस्ताव

The second installment of Rs. 194.5 million for disadvantaged farmers | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३९३ कोटी २६ लाखाचा दुसरा हप्ता

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३९३ कोटी २६ लाखाचा दुसरा हप्ता

Next

जळगाव : आॅक्टोबर महिन्यात अतिपावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून दुसºया टप्प्यात जिल्ह्यासाठी ३९३ कोटी २६ लाख २ हजार रुपये प्राप्त झाले असून हा निधी तालुक्यांना वितरीत करण्यात आला आहे. या पूर्वी पहिल्या टप्प्यात १७९ कोटी ९८ लाख एक हजार रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी मिळाला होता. दरम्यान, जिरायत व बागायतीसाठी प्रती हेक्टरी मदत १३ हजार ५०० रुपयांवरून ८ हजार रुपये प्रती हेक्टरी करण्यात आल्याने जिल्ह्यासाठी असलेल्या एकूण ६४३ कोटी ६४ लाख ५२ हजार ३२३ रुपयांच्या मदतीच्या प्रस्तावाची रक्कम ५७४ कोटी २६ लाख २२ हजार ९०० रुपयांवर आली आहे.
आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिपावसामुळे जिल्ह्यात ७ लाख ४ हजार ८४३ हेक्टरवर नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना मदत मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ६४३ कोटी ६४ लाख ५२ हजार ३२३ रुपयांचा मदतीचा सुधारीत प्रस्ताव राज्य शासनाच्या सचिवांकडे (मदत व पुनर्वसन) सादर करण्यात आला होता. त्यानंतर १९ नोव्हेंबर रोजी शासनाच्यावतीने परिपत्रक काढून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. यामध्ये नाशिक विभागासाठी पहिल्या ५७३ कोटी चार लाख ९२ हजाराचा निधी मंजूर झाला व त्यापैकी जळगाव जिल्ह्यासाठी १७९ कोटी ९८ लाख एक हजार रुपयांचा निधी मिळाला होता. तो वितरीत झाला असून आता दुसºया टप्प्यात ३९३ कोटी २६ लाख २ हजार रुपये मंजूर करण्यात आले. ते प्राप्त झाल्यानंतर हा निधी तालुक्यांना वितरीत करण्यात आले.
एकूण अनुदानाची रक्कम झाली कमी
जिल्ह्यासाठी ६४३ कोटी ६४ लाख ५२ हजार ३२३ रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यात पहिल्या टप्प्यात १७९ कोटी ९८ लाख एक हजार रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी मिळाला होता. मात्र जिरायत व बागायत शेतीसाठी पूर्वी प्रती हेक्टरी १३ हजार ५०० रुपयांची मदत देण्याचे नियोजन होते. मात्र आता प्रती हेक्टरी रक्कम ८ हजार रुपये करण्यात आल्याने एकूण प्रस्तावाची रक्कम ५७४ कोटी २६ लाख २२ हजार ९०० रुपयांवर आली आहे.

Web Title: The second installment of Rs. 194.5 million for disadvantaged farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव