दुसऱ्या लाॅकडाऊनने कालवले अनेकांच्या वैवाहिक जीवनात वीष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:12 AM2021-06-06T04:12:39+5:302021-06-06T04:12:39+5:30

दुसऱ्या लाॅकडाऊनने कालवले वैवाहिक जीवनात वीष ! पोलिसांच्या महिला सहाय्य कक्षाकडे दीड वर्षात १५९३ तक्रारी जळगाव : लाॅकडाऊन काळात ...

The second lockdown poisoned the marital life of many! | दुसऱ्या लाॅकडाऊनने कालवले अनेकांच्या वैवाहिक जीवनात वीष !

दुसऱ्या लाॅकडाऊनने कालवले अनेकांच्या वैवाहिक जीवनात वीष !

Next

दुसऱ्या लाॅकडाऊनने कालवले वैवाहिक जीवनात वीष !

पोलिसांच्या महिला सहाय्य कक्षाकडे दीड वर्षात १५९३ तक्रारी

जळगाव : लाॅकडाऊन काळात उद्योग, व्यवसाय बंद झाल्याने अनेकांचा रोजगार थांबला. त्यामुळे अनेक जण घरीच थांबून होते, त्याचा परिणाम नुसता रोजगार बुडाल्यावरच नाही तर या काळात पती-पत्नीमध्ये भांडणाच्याही घटना मोठ्या प्रमाणात घडल्यात. त्यांच्या वैवाहिक जीवनात अडथडे निर्माण झाले आहेत. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत पती-पत्नीच्या भांडणाची ६४१ प्रकरणे पोलिसांच्या महिला साई कक्षाकडे आलेले आहेत.

जानेवारी २०२० पासून तर मे २१२१ पर्यंत या दीड वर्षात पोलिसांचा भरोसा सेल अर्थात महिला सहाय्य कक्षात १५९६ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी २०२० मध्ये ५९ तर २०२१ मध्ये ५५ तक्रारीतील पती- पत्नीतील भांडणे सोडविण्यात आली आहेत. २१२ प्रकरणांमध्ये पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत. १२० प्रकरणांमध्ये पती पत्नी न्यायालयात गेले आहेत.२७० च्यावर प्रकरणांमध्ये तर तक्रार करणाऱ्या पती-पत्नीने तर भरोसा सेलकडे फिरुनही पाहिले नाही, त्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित पडले आहेत.

महिला सहाय्य कक्षाकडे जानेवारी २०२० पासून आलेल्या एकूण तक्रारी : १५९३

दुसऱ्या लाॅकडाऊन काळात आलेल्या तक्रारी : ६४१

*सासू सासरे आणि मोबाईल ठरतेय कारण*

महिला सहाय्य कक्षाकडे आलेल्या सर्वाधिक तक्रारीत पत्नी मोबाईलवर जास्त वेळ बोलते तसेच सासू सासरे घरात नकोच, एकांतच हवा आदी कारणे समोर आलेली आहेत. पत्नी जास्त वेळ मोबाईल वर बोलत असल्याने व तिला संशय निर्माण होतो तर सासू-सासरे देखील अडथळे ठरतात काही प्रकरणात पत्नी मोबाईल वर जास्त वेळ होत असल्याने ने घरातील कामे प्रलंबित असतात व परिणामी ही कामे सासू-सासर्‍यांना करावी लागतात. त्यामुळे पती-पत्नीत दरी निर्माण झालेली काही उदाहरणे समोर आली आहेत.

*११४ पती पत्नीचे सोडविले भांडण*

महिला सहाय्य कक्षात दीड वर्षात आलेल्या १५९३ तक्रारींपैकी ११४ प्रकरणांमध्ये पती पत्नीचे भांडण सोडण्यात आलेले आहे. यंदाच्या लाॅकडाऊनमध्ये ५५ जणांचे वाद मिटविण्यात आले आहेत. या दाम्पत्याचा संसार आता सुरळीत सुरू आहे.

बाॅक्स

*सासू नको म्हणून पतीला सोडले*

पती-पत्नीच्या एका प्रकरणात सासू नको म्हणून पत्नीने पतीला सोडण्याचा प्रकार समोर आलेला आहे. आधी पती नोकरीला होता तर पत्नी नोकरीला नव्हती. तेव्हा सासू सासर्‍याला पत्नीने वागविले. नंतर सासूला आजारपण आले. या आजारपणात आपण सासुचे करणार नाही, म्हणून सुनेने भूमिका घेतली. त्यामुळे आईच्या आजारपणासाठी मुलाने नोकरी सोडली. दुसरीकडे पत्नीने नोकरी मिळवली आणि पतीला सोडले.

बाॅक्स

*दारुचे व्यसनही ठरतेय संसारात घातक*

पती सतत दारु पितो, कामधंदा करीत नाही. दारु प्यायल्यानंतर पत्नीला मारहाण करतो, घाणेरडी शिवीगाळ करतो अशाही तक्रारी असंख्य महिला कक्षाकडे आलेल्या आहेत. दारुमुळे अनेक महिलांनी पतीला सोडलेले आहे. अगदी कमी प्रमाणात त्यांचे संसार जुडलेले आहेत. ज्या दिवशी पती दारु सोडेल, त्याच दिवशी नांदायला जाईल अशी भूमिका अनेक प्रकरणांमध्ये पत्नीने घेतल्याचे दिसून आले आहे.

कोट....

लाॅकडाऊन असले तरी पती-पत्नीमधील वादाच्या तक्रारी कमी झालेल्या नाहीत.दोघांमध्ये सासू-सासऱ्यांचा अडथळा. पती असो किंवा मोबाईलवरच जास्त असते पतीचे दारुचे व्यसन किंवा पती-पत्नींमध्ये संशयाचे वातावरण यामुळेच संसारात दरी निर्माण झाल्याचे अनेक प्रकरणं आली आहेत.

- सविता परदेशी, महिला सहाय्य कक्ष (भरोसा सेल)

Web Title: The second lockdown poisoned the marital life of many!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.