रस्त्याच्या दुरवस्थेचा सलग घेतला दुसरा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 02:22 PM2019-07-15T14:22:01+5:302019-07-15T14:24:10+5:30

शिव कॉलनीजवळ तरुण ठार : रात्री १० वाजेची घटना

The second victim took the lead of the road | रस्त्याच्या दुरवस्थेचा सलग घेतला दुसरा बळी

रस्त्याच्या दुरवस्थेचा सलग घेतला दुसरा बळी

Next

जळगाव : चित्रा चौकात खड्ड्याने उद्योजक अनिल बोरोले यांचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच सलग दुसऱ्या दिवशी रविवारी रात्री १० वाजता खराब साईडपट्ट्याने उज्ज्वल उर्फ पप्पू सोपान सोनवणे (२६, रा. सावखेडा बु.ता.जळगाव) या तरुणाचा बळी घेतला. खराब साईडपट्टीमुळे दुुचाकी घसरल्याने मागून आलेल्या वाहनाचे चाक उज्ज्वल याच्या डोक्यावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शिवकॉलनी स्टॉपवर घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्ज्वल सोनवणे याच्या साडूचे वडील एका खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्यांच्या जेवणाचा डबा देण्यासाठी शहरात आला होता. हे काम आटोपल्यानंतर दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.टी.००४७) घरी जात असताना महामार्गावर शिवकॉलनी थांब्याजवळ साईडपट्टीवरुन दुुचाकी घसरली, त्यामुळे उज्ज्वल रस्त्याच्या कडेने फेकला गेला व त्याचवेळी पाळधीकडे भरधाव वेगाने जाणारे चारचाकी वाहन उज्ज्वल याच्या डोक्यावरुन गेल्याने तो जागेवरच गतप्राण झाला.
मोबाईलवरुन पटली ओळख
या अपघातानंतर मृत तरुणाला जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी लोकांनी अनेक वाहनांना थांबविण्यासाठी विनंती केली, कोणतेच वाहन मदतीसाठी थांबत नव्हते, त्यामुळे तब्बल अर्धा तास मृतदेह जागेवर पडून होता. त्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला होता. शेवटी एका चारचाकी वाहनातून मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. दरम्यान, घटनास्थळावर काही तरुणांनी उज्ज्वल याचा मोबाईल तपासला असता शेवटचा फोन सासऱ्यांना लागलेला होता. त्यावर संपर्क साधल्यावर उज्ज्वल याची ओळख पटली.
एकुलता मुलगा... उज्ज्वल हा एकुलता मुलगा होता. त्याचे वडील सोपान कौतिक पाटील नायब तहसीलदार म्हणून निवृत्त झाले आहेत. आई कल्पना गृहीणी असून दोन बहिणी विवाहित आहेत. उज्ज्वल काही दिवसापूर्वी भाजी मार्केटमध्ये कामाला होता, मात्र सध्या ते कामही सोडलेले होते. सहा महिन्यापूर्वीच रावेर येथील कोमल या तरुणीशी त्याचा विवाह झाला होता.

Web Title: The second victim took the lead of the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.