खाकीतील ‘सिक्रेट सुपर स्टार’ला जगभरातून ‘सॅल्यूट’, संघपालच्या गाण्याला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 04:54 AM2017-11-29T04:54:05+5:302017-11-29T04:54:22+5:30

‘टॅलेन्टेड बच्चे होते है ना़़़ वो सोडे की बबल की तरह होते है़़़ एक के बाद एक, ऐसेही उपर ऊठ आते है, उन्हे कोई रोक नही सकता’ या सिक्रेट सुपर स्टार चित्रपटातील आमीर खानच्या ‘डायलॉग’ला

 'Secret Super Star' in Khakee | खाकीतील ‘सिक्रेट सुपर स्टार’ला जगभरातून ‘सॅल्यूट’, संघपालच्या गाण्याला पसंती

खाकीतील ‘सिक्रेट सुपर स्टार’ला जगभरातून ‘सॅल्यूट’, संघपालच्या गाण्याला पसंती

Next

- किशोर पाटील
जळगाव : ‘टॅलेन्टेड बच्चे होते है ना़़़ वो सोडे की बबल की तरह होते है़़़ एक के बाद एक, ऐसेही उपर ऊठ आते है, उन्हे कोई रोक नही सकता’ या सिक्रेट सुपर स्टार चित्रपटातील आमीर खानच्या ‘डायलॉग’ला जिल्हा पोलीस दलातील पोलीस नाईक संघपाल खुशाल तायडे यांनी सार्थकी ठरविले आहे़
मित्रांच्या घोळक्यात केवळ मनोरंजनासाठी गाणे म्हणणाºया या कर्मचाºयाच्या गाण्यांनी अवघ्या काही दिवसांतच सोशल मीडियावर धमाल केली आहे. २००७ साली संघपाल पोलीस दलात भरती झाले़ यापूर्वी त्यांनी ठाणे येथे सेवा बजावली आहे़
२३ नोव्हेंबर रोजी संघपाल तायडे, राजेश पाटील यांची शिर्डी येथे बंदोबस्तासाठी ड्युटी लागली होती़ मनोरंजन म्हणून सहकाºयांनी तायडे यांस गाणे म्हणण्यास सांगितले़ खेळ मांडला, दुष्काळ तसेच सैराट झालं जी. अशी तीन गाणी त्यांनी म्हटली़ राजेश पाटील यांनी गाण्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला़ तायडे यांचा सोलापूर येथे पोलीस असलेला मित्र अभिजित मुळे यानेही तो सर्वत्र शेअर केला़
या व्हिडिओने जगभरात धम्माल उडविली असून आतापर्यंत १७ लाखांपेक्षा अधिक जणांच्या पसंतीस पात्र ठरला आहे़ भारतासह अमेरिका, कॅनडा, सिंगापूर या देशांमधूनही फोनवरून अभिनंदन, शुभेच्छांचे हजारो फोन आल्याचेही तायडे यांनी सांगितले़

चित्रपटात गाणे म्हणणार
गायनाची कौटुंबिक पार्श्वभूमी नाही की क्लास लावला नाही अशा संघपाल तायडेंना व्हिडीओमुळे हिंदी, मराठी चित्रपटात गायनासह अभियनाच्या आॅफर्स मिळाल्या आहेत़ आगामी दोन
चित्रपटात तायडे अभिनयासह दिग्गज गायकांसोबत गाणेही म्हणणार आहेत़
 

Web Title:  'Secret Super Star' in Khakee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.