जळगावच्या खाकीतील ‘सिक्रेट सुपरस्टारला’ जगभरातून ‘सॅल्यूट’, 17 लाख नागरिकांकडून दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:38 PM2017-11-28T12:38:15+5:302017-11-28T12:54:28+5:30

मित्रांच्या घोळक्यात केवळ मनोरंजनासाठी गाणे म्हणणाऱ्या  या कर्मचाऱ्याच्या गाण्यांनी अवघ्या काही दिवसातच सोशल मीडियावर धमाल केली आहे.  

'Secret Superstars' in Jalgaon's Khakhi, 'Salute' across the globe | जळगावच्या खाकीतील ‘सिक्रेट सुपरस्टारला’ जगभरातून ‘सॅल्यूट’, 17 लाख नागरिकांकडून दाद

जळगावच्या खाकीतील ‘सिक्रेट सुपरस्टारला’ जगभरातून ‘सॅल्यूट’, 17 लाख नागरिकांकडून दाद

Next
ठळक मुद्देमित्रांच्या घोळक्यात केवळ मनोरंजनासाठी गाणे म्हणणाऱ्या  या कर्मचाऱ्याच्या गाण्यांनी अवघ्या काही दिवसातच सोशल मीडियावर धमाल केली आहे.  मनोरंजन म्हणून सहकाऱ्यांनी तायडे यास गाणे म्हणण्यास सांगितले. व्हिडीओने जगभरात धम्माल उडविली असून आतार्पयत 17 लाखापेक्षा अधिक जणांच्या पसंतीस पात्र ठरला आहे. 

- किशोर पाटील 

जळगाव-  ‘टॅलेन्टेंड  बच्चे होते है ना वो सोडे की बबल की तरह होते है, एक के बाद एक, एैसेही उपर ऊठ आते है, उन्हे कोही रोक नही सकता ’ या सिक्रेट सुपर स्टार चित्रपटातील आमीर खानच्या ‘डायलॉग’ला जिल्हा पोलीस दलातील पोलीस नाईक संघपाल खुशाल तायडे या कर्मचा-याने सार्थकी ठरविले आहे. मित्रांच्या घोळक्यात केवळ मनोरंजनासाठी गाणे म्हणणाऱ्या  या कर्मचाऱ्याच्या गाण्यांनी अवघ्या काही दिवसातच सोशल मीडियावर धमाल केली आहे.  

वाकोद येथील  ग्रामसेवक अप्पा म्हणून जिल्हाभरात ओळख असलेल्या खुशाल तायडे यांचे संघपाल तायडे हे चिरंजीव आहेत. आई,  दोन भाऊ असा तायडेंचा परिवार असून  2007 साली संघपाल पोलीस दलात भरती झाले. यापूर्वी त्यांनी ठाणे सेवा बजावली आहे.

असा पोहचला व्हिडीओ राज्यभर

23 नोव्हेंबर रोजी संघपाल तायडे, राजेश पाटील या पोलीस कर्मचाऱ्यांनी  शिर्डी येथे बंदोबस्त कामी ड्युटी लागली होती.  यादरम्यान मनोरंजन म्हणून सहकाऱ्यांनी तायडे यास गाणे म्हणण्यास सांगितले.  खेळ मांडला, दुष्काळ तसेच सैराट झालं जी असे तीन गाणे त्याने म्हटले.  राजेश पाटील यांनी या गाण्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला. तायडे यांचा सोलापूर येथे पोलीस असलेला मित्र अभिजित मुळे यानेही तो सर्वत्र शेअर केला. या व्हिडीओने जगभरात धम्माल उडविली असून आतार्पयत 17 लाखापेक्षा अधिक जणांच्या पसंतीस पात्र ठरला आहे.  भारतासह अमेरिका कॅनडा, सिंगापूर या देशांमधूनही फोनवरुन नागरिक अभिनंदन, शुभेच्छांचे हजारो फोन आल्याचेही तायडे यांनी  सांगितलं. 

अन् मिळाल्या गायनासह अभिनयाच्या ‘ऑफर्स’
गायनाची कौटुंबिक पाश्र्वभूमी नाही की क्लास लावला नाही अशा संघपाल तायडेंना व्हिडीओमुळे हिंदी, मराठी चित्रपटात गायनासह अभियनाच्या ऑफर्स मिळाल्या आहेत़ आगामी दोन चित्रपटात तायडे अभियानासह दिग्गज गायकांसोबत गाणेही म्हणणार आहेत.

आईमुळे गायनाची आवड आहे.  सेवा बजावताना गायनाची गोडी लागली. ताणतणावात  गाणे म्हणायचो कुटुंबांचे तसेच पोलीसअधीक्षक दत्तात्रय कराळे यांचे प्रोत्साहन मिळाले.  या यशात मित्र आरोग्यदूत रामेश्वर नाईक, दिग्दर्शक धनंजय कीर्तने, सुनील सूर्यवंशी, अमित देशमुख यांचाही मोलाचा वाटा आह़े प्रत्येकात कलाकार दडलेला असतो, त्याला जगासमोर येवू द्या.
-संघपाल तायडे, पोलीस नाईक

Web Title: 'Secret Superstars' in Jalgaon's Khakhi, 'Salute' across the globe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.