‘राष्ट्रीय इन्स्पायर’साठी १९ उपकरणांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 10:39 PM2018-12-16T22:39:14+5:302018-12-16T22:41:29+5:30

टेहू, ता.पारोळा येथे आयोजित सातव्या इन्स्पायर अवार्ड राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात नाशिक येथील विद्यार्थिर्नी ऋतुजा डी.सूर्यवंशी हिचे अपघात रोखणारी गाडी या उपकरणाला प्रथम क्रमांक मिळाला. एकूण १९ उपकरणाची निवड राष्ट्रीय पातळीवर करण्यात आली आहे.

A selection of 19 tools for 'National Inspire' | ‘राष्ट्रीय इन्स्पायर’साठी १९ उपकरणांची निवड

‘राष्ट्रीय इन्स्पायर’साठी १९ उपकरणांची निवड

Next
ठळक मुद्देटेहू राज्यस्तरीय इन्स्पायर विज्ञान प्रदर्शनाचा समारोपनाशिकच्या ऋतुजा सूर्यवंशीचे उपकरण ठरले विजेतेनवी दिल्ली येथे होणार राष्ट्रीय स्तरावरील इन्स्पायर विज्ञान प्रदर्शन

पारोळा, जि.जळगाव : विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे आणि वसंतराव मोरे तंत्रनिकेतन, टेहू, ता.पारोळा यांच्यातर्फे टेहू, ता.पारोळा येथे आयोजित सातव्या इन्स्पायर अवार्ड राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात नाशिक येथील विद्यार्थिर्नी ऋतुजा डी.सूर्यवंशी हिचे अपघात रोखणारी गाडी या उपकरणाला प्रथम क्रमांक मिळाला. एकूण १९ उपकरणाची निवड राष्ट्रीय पातळीवर करण्यात आली आहे.
या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन इन्स्पायर अवार्डचे बक्षीस वितरण रमण मॅगसेसे पुरस्कार विजेते नीलिमा मिश्रा यांच्या हस्ते या राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या बालवैज्ञानिकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.वसंतराव मोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मॅगसेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा, प्रा.राजकुमार अवसरे, विज्ञान पर्यवेक्षक शेखर पाटील, राज्य विज्ञान शिक्षण परिषद नागपूरचे अधिव्याख्याते विलास करोले, विज्ञान परिषद राज्य समनव्यक व इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनाच्या पर्यवेक्षक डॉ.प्रियंका खोले, डॉ.मनीष भोयर, माधुरी पाटील, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रोहन मोरे, संचालक पराग मोरे, जितेंद्र पवार, विजय जीवन पाटील, प्रा.व्ही.एन. कोळी, प्राचार्य विपुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनाचे पर्यवेक्षक डॉ.मनीष भोयर यांनी मांडलेल्या एकूण १९२ उपकरणांपैकी १० टक्के म्हणजे १९ उपकरणाची निवड राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनासाठी निवड झाल्याचे सांगितले. नवी दिल्ली येथे राष्टÑीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन होणार आहे.
सूत्रसंचालन राज्य विज्ञान संशोधन संस्थेचे शेखर पाटील व प्रतिभा गोहणे यांनी केले.
यांनी केले पर्यवेक्षण
डॉ.मनीष भोयर, डॉ.प्रियंका खोले, मधुरा पाटील, डॉ.पी.एस.पाटील, प्रा.पी.आर. सपकाळे, डॉ.उल्हास पाटील, प्रा.इ.आर.देवरे यांनी काम पाहिले, तर सहायक म्हणून रामचंद्र चुकांबे यांनी काम पाहिले.
निवड झालेली उपकरणे व विद्यार्थ्यांची नावे
ऋतुजा डी.सूर्यवंशी, नाशिक (अपघात रोखणारी गाडी), कृष्णा रामदास जाधव-नाशिक (बहुउद्देशीय फवारणी यंत्र), मोहंमद अन्सारी-नाशिक (वायरलेस माऊस), आर्या दिनेश पाटील, नंदुरबार (तांत्रिक पंखा उपयोग), विशाल संजय खोत,-कोल्हापूर (बोरवेलमधील अपघात यंत्रमानव), माणिकराव बी.पाटील,-कोल्हापूर (शेतकऱ्यांचा मित्र), राहुल लक्ष्मण बेडस्कर -सातारा (शेंगदाणे फोडणारे यंत्र), प्राची धाकू लेस्टरे-सिंधुदुर्ग (अपंगांसाठीच्या कुबड्या), श्रुती एस अवटे-पुणे (बहुउद्देशीय काठी), अर्थव डी.घुले-पुणे (पुरातून वीज निर्मिती गृह), मनीष बी.अटोले-पुणे बहुउद्देशीय कॅलिबर अंतर), साक्षी प्रकाश कंक-पुणे (स्वयंचलित गेयर बदल वाहन), आशिष अजय राऊत- अहमदनगर (घडीचे शौचालय), प्रणाली डी.देवरे, अहमदनगर- (सोलर सेविंग यंत्र), ऋषिकेश लोहाटे-अहमदनगर (बहुउद्देशीय सायकल), दीपाली जी. भुते-जालना (बहुउद्देशीय शेतकरी काठी), अनिकेत पी.काकडे-यवतमाळ (अनेक आवाज रोखणारा रोबो), अवंती खाडे- वासीम, सुमित किशोर युराडे-वर्धा (कंपन करणारी खुर्ची)

Web Title: A selection of 19 tools for 'National Inspire'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.