उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहीमेसाठी भुसावळ तालुक्यातील 32 गावांची निवड
By admin | Published: May 24, 2017 02:55 PM2017-05-24T14:55:57+5:302017-05-24T14:55:57+5:30
रोहीणी नक्षत्रात शेतक:यांना कृषी विभाग करणार मार्गदर्शन
Next
>ऑनलाईन लोकमत
भुसावळ, दि.24- कृषी विभागातर्फे 2017-2018 या वर्षासाठी ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ ही मोहीम 25 ते 8 जून या दरम्यान पावसाच्या रोहिणी नक्षत्रात राबविली जाणार आहे ,अशी माहिती येथील सहाय्यक तालुका कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे यांनी दिली. या मोहीमेत भुसावळ तालुक्यातील 32 गावांची निवड करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
रोहिणी नक्षत्रातील 25 ते 8 जून दरम्यान 32 गावांमधील शेतक:यांना बीज प्रक्रिया व कृषी विद्यापीठातर्फे संशोधीत उडीद,मूग, सोयाबीन, देशी कापूस, ज्वारी या वाणांची माहिती देऊन त्यांच्या लागवडीबाबत मार्गदर्शन करतील.
मोहीमेत कृषी विभागाचे अधिकारी, पाल आणि ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रातील संशोधक शास्त्रज्ञ, कृषी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत. ते शेतक:यांना या काळात मार्गदर्शन करणार आहेत.
दरम्यान, श्रीकांत झांबरे म्हणाले की, यावर्षी कृषी विभाग नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन पिकांच्या जणुकीय क्षमतांचा वापर करुन जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतक:यांमध्ये प्रचार-प्रसार करण्यावर भर देणार आहे. त्या दृष्टीने नियोजन केले जात आहे. यावर्षी यांत्रिकी करणाद्वारे मशागत करण्यावर अधिक भर देण्यासाठी शेतक:यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.