जिल्ह्यातील ४१ विद्यार्थ्यांची राष्ट्रीयस्तर प्रज्ञाशोध परीक्षेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:24 AM2021-06-16T04:24:07+5:302021-06-16T04:24:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत १३ डिसेंबरला घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत १३ डिसेंबरला घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. इयत्ता दहावीसाठी झालेल्या राज्यस्तरीय चाचणी परीक्षेत जिल्ह्यातील ४१ विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत १३ डिसेंबर २०२० रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्यातून ९४३११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दरम्यान, सोमवारी निवड यादी व शाळानिहाय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. यात राज्यातील ८२१ विद्यार्थ्यांची राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील ४१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राष्ट्रीयस्तर प्रज्ञाशोध परीक्षा दिल्लीतील एसीईआरटीमार्फत घेतली जाणार आहे.
===============
- या राज्यस्तरीय परीक्षेत जळगाव जिल्ह्यातून खुला प्रवर्गातून १७ विद्यार्थी, ओबीसी प्रवर्गातून १७ विद्यार्थी, एससी प्रवर्गातून ०३ विद्यार्थी, तर एसटी प्रवर्गातून ०४ अशा एकूण ४१ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय परीक्षेसाठी निवड झाली आहे.
- खुला प्रवर्गातून मैत्रज्ञ महेश पाटील, ओम चंद्रकांत चौधरी, विपुल योगेश वंजारी, प्रणाद नीलेश लाखोटे, स्नेहा योगेश पाटील, क्रिष्णा ईश्वर देशमुख, नचिकेत राहुल पाटील, अक्षय भाविक भन्साली, अथर्व प्रशांत पाटील, निश्चय संदीप पाटील, अथर्व नितीन पाटील, भाग्या योगेश अग्रवाल, अनुज अजय पाटील, अनुराग दिलीप ठाकरे, रितांशू देवेंद्र सदाफळे, तन्मय शरद माथुरवैश्य, कलश पंकज भय्या आदींनी यश मिळविले आहे.
- ओबीसी प्रवर्गातून अर्णव नितीन पाटील, वेदांत सुनील वंजारी, वेदांत विकास शेलकर, वेदांत कमलेश नेहते, वेद संजय थोरात, कौशल कुंदन वायकोळे, शर्वरी राजेश खरे, किरण संजीव पाटील, साहील सुधीर नारखेडे, प्रणव सुनील पवार, गौरी सुशील राणे, निषाद मधुकर चौधरी, अदिती प्रमोद पिंगळे, राजन सुधीर पाटील, तेजस सतीश नारखेडे, नेहा राजेश भंगाळे, डिंपल सुदीप राणे यांनी यश मिळविले आहे.
- एससी प्रवर्गातून महेश हुकूम बाविस्कर, अथर्व आत्माराम चिमकर, सायली शैलेंद्र नन्नवरे यांनी यश संपादन केले आहे.
- एसटी प्रवर्गातून हिमांशू दिलीप बाविस्कर, अनुजा संतोष ठाकूर, माधवी राजेंद्र कोळी, गौरी काशीराम बारेला यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
=================
आता राष्ट्रीय परीक्षेसाठी तयारी
राज्यस्तरीय फेरीची परीक्षा डिसेंबरमध्ये घेण्यात आली. त्याचा निकाल सोमवारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. लेवल-१ मध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. राष्ट्रीयस्तर एनटीएसई परीक्षा एनसीईआरटी नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे. संबंधित निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे एनसीईआरटी नवी दिल्ली यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.