एसएसबीटीच्या पाच विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:12 AM2020-12-27T04:12:21+5:302020-12-27T04:12:21+5:30

जळगाव : बांभोरी येथील श्रमसाधना बॉम्बे ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालयात लेफ्ट राईट माईंड प्रा. लि. पुणे येथील ...

Selection of five SSBT students in an international company | एसएसबीटीच्या पाच विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड

एसएसबीटीच्या पाच विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड

googlenewsNext

जळगाव : बांभोरी येथील श्रमसाधना बॉम्बे ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालयात लेफ्ट राईट माईंड प्रा. लि. पुणे येथील कंपनीच्या टेक्निकल टीमने डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून मुलाखतीचे आयोजन केले होते. या मुलाखतीमध्ये महाविद्यालयातील संगणक विभागाच्या ५ विद्यार्थ्यांची कंपनीत निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये स्नेहल पाटील, रुपेश झोपे, प्रशांत पाटील, हर्षल गुरव, परमेश्वर राजपूत यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शेखावत, प्राचार्य डॉ. के. एस. वाणी, उपप्राचार्य डॉ. एस. पी. शेखावत, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. एस. ए. ठाकूर, संगणक विभागप्रमुख डॉ. जी. के. पटनाईक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या मुलाखत प्रक्रियेसाठी सौरभसिंघ राजवत, सुशांत एस. बाहेकर, प्रदीप सोळंकी, प्रवीण पाटील यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Selection of five SSBT students in an international company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.