मुक्ताईनगर तालुका मेडिकल डीलर असो.ची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 14:19 IST2021-02-02T14:19:27+5:302021-02-02T14:19:49+5:30
मुक्ताईनगर तालुका मेडिकल डीलर असो.ची निवड करण्यात आली.

मुक्ताईनगर तालुका मेडिकल डीलर असो.ची निवड
मुक्ताईनगर : तालुका मेडिकल डीलर असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय सिसोदिया तर सचिवपदी घनश्याम टावरी यांची निवड करण्यात आली आहे.
असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हा कार्यकारिणी सदस्य शरद गाजरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. यात सर्वानुमते पुढील तीन वर्षासाठी निवडण्यात कार्यकारिणी निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी संजीवकुमार सुगनचंद जैन ( सिसोदिया), सचिव घनश्याम टावरी, उपाध्यक्ष वसंत केने, सहसचिव राहुल जैन, खजिनदार नीळकंठ महाजन, जिल्हा कार्यकारणी सदस्य शरद गाजरे यांचा समावेश आहे.
सभेमध्ये सुनील उदे, सचिन जैन, धनपाल रेदासनी, राहुल जैन, रवी गोइंका, राहुल सरोदे, नीलेश पाटील, इरफान बागवान, शाहरुख शेख, नितीन नारखेडे आदी सदस्य उपस्थित होते.