प्रकाश सोनवणे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:16 AM2021-03-08T04:16:53+5:302021-03-08T04:16:53+5:30
स्टेशन समोर पुन्हा थाटले अतिक्रमण जळगाव : रेल्वे स्टेशन समोरील अतिक्रमणावर गेल्या आठवड्यात मनपाने कारवाई केल्यानंतर, सर्व रस्ता मोकळा ...
स्टेशन समोर पुन्हा थाटले अतिक्रमण
जळगाव : रेल्वे स्टेशन समोरील अतिक्रमणावर गेल्या आठवड्यात मनपाने कारवाई केल्यानंतर, सर्व रस्ता मोकळा झाला होता. मात्र, मनपाची कारवाई थंडावल्याने या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण थाटले आहे. तरी मनपाने पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
उघड्यावरील खाद्यपदार्थांमुळे आरोग्याला धोका
जळगाव : रेल्वे स्टेशन परिसरात विविध खाद्य पदार्थ विक्रेत्यांकडून उघड्यावरच खाद्य पदार्थ विक्री करण्यात येत असल्यामुळे, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरी अन्न व औषध प्रशासन विभागाने या व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
स्टेशन परिसरात थाटले अवैद्य धंदे
जळगाव : रेल्वे स्टेशनकडून जिल्हा परिषदकडे जाणाऱ्या रस्त्यावर खाद्य पदार्थ विक्री होणाऱ्या गाडींवर सर्रास दारूचींही विक्री होत आहे. यामुळे परिसरातील उद्योजकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. तरी पोलिसांनी या खाद्यपदार्थ विक्री होणाऱ्या गाड्यांची तपासणी करून, अवैद्य धंदे करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
गटार तुंबल्यामुळे डासांचा उपद्रव
जळगाव : जिल्हा परिषद चौकातून रेल्वे स्टेशनकडे जातांना रस्त्यालगत असणारी गटार तुंबल्यामुळे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी व्यावसायिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तरी मनपा प्रशासनाने येथील गटारीची स्वच्छता करण्याची मागणी व्यावसायिकांमधून केली जात आहे.