स्मार्ट इंडिया हॅकथॉन स्पर्धेत एसएसबीटी च्या विद्यार्थिनींची निवड
By Admin | Published: April 2, 2017 06:07 PM2017-04-02T18:07:26+5:302017-04-02T18:07:26+5:30
नोएडा येथे ‘स्मार्ट इंडिया हॅकथॉन’ या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत बांभोरी येथील एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहा विद्यार्थिनींची निवड केली आहे.
महाराष्ट्रातील एकमेव संघ : ‘एआयसीटीई’ साठी संकेतस्थळाची निर्मिती
जळगाव-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजीटल इंडिया’ व ‘स्टार्ट अप इंडिया’ या सारख्या उपक्रमामध्ये युवकांचा सहभाग वाढावा यासाठी नोएडा येथे ‘स्मार्ट इंडिया हॅकथॉन’ या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत बांभोरी येथील एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहा विद्यार्थिनींची निवड केली असून, स्पर्धेच्या प्राथमिक 7 हजार 500 संघामधून निवड झालेल्या 1 हजार 200 संघामध्ये एस.एस.बी.टी.च्या संघाचा समावेश आहे. महाराष्ट्रातील एकमेव संघ या स्पर्धेत सहभागी झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार ही स्पर्धा घेतली जात आहे. केंद्रीय खात्यातील अडचणी, सुसूत्रता, काम करण्याचा पध्दती या संबधिचे प्रश्न आणि उपाय या विषयावर ही स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये आय.आय.टी. मार्फत निवडीसाठी निकष लावले गेले आहेत. या स्पर्धेत निवड झालेल्या सहा विद्यार्थिनींमध्ये रुपाली पाटील, अनुराधा तोमर, ज्योती पाटील, मृणाली पाटील, भायश्री पाटील, रोहिणी पाटील यांचा समावेश आहे. त्यांना संगणक विभागप्रमुख डॉ.जी.के.पटनाईक यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.एस.वाणी, डॉ.आर.एच.गुप्ता, शशिकांत कुलकर्णी, डॉ.जि.के.पटनाईक यांनी संयोजक प्रा.दिनेश पुरी व विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.