१६ मे रोजी निवड चाचणी परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:15 AM2021-03-27T04:15:57+5:302021-03-27T04:15:57+5:30
शिष्यवृत्ती अर्ज भरा जळगाव : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क ...
शिष्यवृत्ती अर्ज भरा
जळगाव : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजनेचे अर्ज गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अद्यापपर्यंत अनु.जाती प्रवर्गाचे ६६ टक्के तर विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गाचे ६९ टक्के अर्ज भरण्यात आलेले आहेत. सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज तत्काळ भरण्यात यावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
पिक विमा योजनेची माहिती मागविली
जळगाव : पिक विमा योजना रब्बी हंगाम २०२०-२१ अंतर्गत जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांची माहिती बँकेमार्फत विहीत मुदतीत विमा पोर्टलवर भरलेली नाही. यामुळे भविष्यात पिक विमा मंजुर झाल्यास शेतकरी लाभार्थी पिक विम्याच्या नुकसान भरपाई पासून वंचित राहू नये, या करिता शेतकऱ्यांची माहिती भरण्याची शेवटची संधी दिली आहे. माहिती भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कर्मचा-यांची माहिती ३१ मार्चपूर्वी अपलोड करा
जळगाव : राज्यातील ३० जूनपर्यंत बंद पडलेल्या, रद्द केलेल्या दिव्यांगाच्या अनुदानित विशेषशाळा, कार्यशाळा मधील मान्यताप्राप्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे नावे आयुक्तालयात ठेवण्यात आलेल्या प्रतीक्षा यादीत समाविष्ठ करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. त्यानुसार संबधित मान्यताप्राप्त कर्मचाऱ्यांनी माहिती ३१ मार्चपर्यंत भरण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे।
अर्थसहाय्यासाठी माहितीचे आवाहन
जळगाव : १५ ऑगस्ट १९४७ ते ३० एप्रिल १९९५च्या कालावधीत युध्दात, मोहिमेत शहीद झालेल्या सैनिकांच्या वारसांना सुवर्ण महोत्सवी योजने अंतर्गत अर्थसहाय्य योजनेसाठी जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या वारसांनी सैन्यसेवेचे कागदपत्रे घेऊन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राहुल पाटील यांनी केले आहे.