विराज कावडिया यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:44 AM2021-02-20T04:44:14+5:302021-02-20T04:44:14+5:30
उपोषण मागे घेण्याचे आवाहन जळगाव : विद्यापीठातील सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढविण्यात आले असून सेवेत सामावून घेण्याबाबतचा प्रस्ताव शासनास ...
उपोषण मागे घेण्याचे आवाहन
जळगाव : विद्यापीठातील सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढविण्यात आले असून सेवेत सामावून घेण्याबाबतचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आल्याने उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन आण्णा आनंदा भिल आणि अन्य कर्मचाऱ्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. विविध मागण्यांसाठी पूर्व कर्मचाऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. ११ फेब्रुवारीला तसे पत्र दिले होते. त्यानुसार विद्यापीठाने हे आवाहन केले आहे. प्र. कुलसचिवांनी याबाबत पत्र काढले आहे.
पटनी हायस्कूल येथे चित्रकला स्पर्धा
जळगाव: मोहम्मद ताहेर पटनी उर्दू हायस्कूल पाळधी येथे शिवजयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, गड, किल्ल्यांचे पोस्टर तयार केले. प्रास्ताविक शाह सईद यांनी केले. मुख्याध्यापक मुश्ताक करिमी, इक्बाल खान यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन नईम बिस्मिल्ला यांनी केले. अकील अजिज यांनी आभार मानले.