विद्यार्थिनींना दिले स्वसरंक्षणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 10:26 PM2020-02-03T22:26:17+5:302020-02-03T22:26:27+5:30
जळगाव - मिशन साहसी अभियातंर्गत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने सोमवारी नंदिनीबाई मुलींच्या विद्यालयात विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले . ...
जळगाव- मिशन साहसी अभियातंर्गत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने सोमवारी नंदिनीबाई मुलींच्या विद्यालयात विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले .
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन महानगरपालिका स्थायी समिती सभापती शुचिता हाडा, सामाजिक कार्यकर्त्या सुधा काबरा, मुख्याध्यापिका चारूलता पाटील, नगरमंत्री सोहम पाटील, प्रशिक्षक प्रवीण राव आदींच्या हस्ते करण्यात आले़ प्रास्ताविक हिमानी वाडीकर हिने केले़ दरम्यान, मार्गदर्शन करताना शुचिता हाडा म्हणाल्या की, महिलांनी कणखर बनले पाहिजे व समस्यांना सामोरे गेले पाहिजे यातुनच मार्ग सापडतील व विद्यार्थी परिषद मिशन साहसी अभियानाअंतर्गत ज्याप्रकारे विद्यार्थिनींना स्व-रक्षणाचे प्रशिक्षण देत आहे ते अभिनंदनीय आहे, असे त्यांनी सांगितले़ तर आत्मसंरक्षणासाठी सदैव तयार असले पाहिजे असे मत अध्यक्षीय भाषणात चारूलता पाटील यांनी व्यक्त केले़ आभार माधुरी पाटील यांनी मांडले़