जळगावात प्राथमिक शिक्षकांचे लाक्षणिक उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 08:11 PM2018-08-18T20:11:46+5:302018-08-18T20:14:08+5:30
प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीतर्फे शनिवार १८ रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले.
जळगाव : प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीतर्फे शनिवार १८ रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले.
जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष विलास नेरकर, समन्वयक अजबसिंग पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शिक्षक सेनेचे ईश्वर सपकाळे, केंद्रप्रमुख संघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील, महिला शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा पाकिजा पटेल, सचिव विद्या बोरोले, शिक्षक भारतीचे सोमनाथ पाटील, शिक्षक समितीचे अध्यक्ष राजेश पवार, पदवीधर शिक्षक संघाचे विजय बागुल, मुख्याध्यापक संघाचे राज्य संघटक लिलाधर सपकाळे, पाचोरा शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष सुनील पाटील, मनोज माळी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
प्रारंभी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या निधनामुळे लाक्षणिक उपोषणा दरम्यान आंदोलनकर्त्यांनी मौनव्रत धारण केले.